सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १२) गवार तेजीत राहिली. गवारीची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४५० असा दर मिळाला आहे. गवारीस रविवारच्या (ता. ९) तुलनेत दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
फ्लॅावरच्या दरात अल्प प्रमाणात वाढ झाली आहे. फ्लॅावरची २४ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला १०० ते १५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरला दहा किलोमागे ३० रुपयांची दरवाढ झाली आहे. इतर सर्व भाजीपाल्याचे दर स्थिर राहले आहेत. शेवग्याची सात क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास ३०० ते ५०० असा दर मिळाला आहे.
वाटाण्याची ३७ क्विंटल आवक होऊन दहा किलो वाटाण्यास ३०० ते ३२० असा दर मिळाला आहे. पावट्याची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलो पावट्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. भेंडीची चार क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते ३२० असा दर मिळाला आहे. हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक होऊन दहा किलो मिरचीस १०० ते १८० असा दर मिळाला आहे.
ढोबळी मिरचीची तीन क्विंटल आवक होऊन दहा किलोस १०० ते २०० असा दर मिळाला आहे. वांग्याची १८ क्विंटल आवक होऊन दहा किलो वांग्यास ८० ते १२० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ३२ क्विंटल आवक होऊन दहा किलो टोमॅटोस ५० ते १०० असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याची तीन क्विंटल आवक झाली. घेवड्यास दहा किलोला २०० ते ३०० असा दर मिळाला आहे.
पालेभाज्यात मेथीची १६०० जुड्याची आवक होऊन मेथीस शेकड्यास ७०० ते ९०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची २३०० जुड्यांची आवक होऊन शेकड्यास ३०० ते ६०० असा दर मिळाला आहे.

0 comments:
Post a Comment