परभणी ः कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये असताना कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. कापूस दराने सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी काॅटन मार्केट यार्डावर मंगळवारी (ता. ९) कापसाची ३ हजार क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ६ हजार २५५ ते ६ हजार ३३५ रुपये दर मिळाले, असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काॅटन मार्केट यार्डावर सध्या चांगल्या प्रतीच्या तसेच फरदड कपाशीची आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी (ता. ८) कापसाची २ हजार ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५ हजार ५०० ते ६ हजार ४२५ रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजवर ३ लाख ५० हजारावर क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ८) ३ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक असताना प्रतिक्विंटल ५ हजार ७०० ते ६ हजार ३५० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ६) ३ हजार क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५ हजार ६०० ते ६ हजार ३५२ रुपये दर मिळाले. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येदेखील कापसाचे दर ६ हजार रुपयांच्या वर गेले आहेत.
सध्या फरदड कपाशीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळालेला भाव आता फरदड कपाशीला मिळत आहे.
दरवाढीचा बहुतांश व्यापाऱ्यांनाच फायदा
कापसाचे दर ६ हजार रुपयांच्या वर गेल्यामुळे दर वाढीच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विक्री केली. त्यामुळे दरवाढीचा फायदा काही शेतकरी आणि बहुतांश व्यापाऱ्यांनाच होत आहे.

0 comments:
Post a Comment