मागील भागात आपण कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या ५०% अनुदानावर शेतक-यांना ताडपत्री पुरविणे, ५०% अनुदानावर शेतक-यांना प्लॅस्टीक क्रेटस पुरविणे, ५०% अनुदानावर शेतक-यांना सुधारीत शेती औजारे पुरविणे. (कडबाकुट्टी यंत्र पुरविणे.), यांसारख्या विविध योजनांचा आढावा घेतला. या भागात आपण इतर महत्वपूर्ण योजनांचा आढावा घेणार आहोत.
नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना मदत करणे.
योजनेचे स्वरुप / माहीती :
जळीतग्रस्त शेतक-यांचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरुन जिल्हापरिषदेस सादर केले जातात. सदर योजनेत जळीतग्रस्त शेतक-यास जि.प. सेस मधुन मदत करतांना नुकसानीच्या ५०% रक्कम किवा रु.११०००/- या पैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम लाभार्थ्याना पंचायत समिती स्तरावरून धनादेशाने नैसर्गिक आपत्तीचे मदत शेतकरी बांधवास केली जातो.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) ज्या शेतकरी बांधवाच्या शेतीची / घरांचे आकस्मिक रित्या जळीत झाल्याने अथवा वीज या मुळे हानी झाल्यास तसेच पशुधनाची हानी झालेल्या शेतकरी बांधवाना योजनेचा लाभ घेता येईल.
२) ७/१२ उतारा, खाते उतारा, तहसीलदारांचा पंचनामा इ. कागदपत्रांसह प्रस्ताव पंचायत समितीस देणे बंधनकारक राहील.
३) ग.वि.अ. / ग्रामसेवक व संबधीत योजनेचे काम पहाणारे कृषि अधिकारी यांचा प्रत्यक्ष दर्शी स्थळ तपासणी दाखला सादर करणे आवश्यक.
४) क्षेत्रमर्यादेची अट नाही.
५) योजनेचा लाभ सर्व घटकांतील शेतकरी बांधवाना घेता येईल.
आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत आदिवासी योजना (TSP)
आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासी योजना (OTSP)
अनुसूचीत जमाती उपयोजना (SCP) – (विशेष घटक योजना)
योजनेचे स्वरुप / माहीती :
योजना | अनुदान मर्यादा |
जमिन सुधारणा | रु. ४०,०००/- |
निविष्ठा | रु. ५,०००/- |
सुधारीत शेती औजारे | रु. १००००/- |
बैलजोडी | रु. ३००००/- |
बैलगाडी | रु. १५०००/- |
जुनी विहिर दुरुस्ती | रु. ३००००/- |
इनवेल बोअरींग | रु. २००००/- |
पाईपलाईन | रु. २००००/- |
पंपसंच | रु. २००००/- |
नविन विहिर | रु. ७०००० ते १०००००/- |
शेततळे | रु. ३५०००/- |
परसबाग | रु. २००/- अनुदान मर्यादा प्रती लाभार्थी |
तुषार ठिबक सिचंन संच | रु. २५०००/- |
ताडपत्री | रु. १००००/- (अनुसूचीत जमाती उपयोजना (SCP) – (विशेष घटक योजना) यांना लागू. |
नविन विहिर या बाबीसाठी रु. १०००००/- रु. पर्यंत अनुदान देय आहे. विहिर व्यतीरीक्त इतर घटकांचा लाभ घेणा-या लाभार्थीसाठी रु.५००००/- अनुदान मर्यादा आहे. प्रत्येक बाबींसाठी १००% अनुदान देय आहे.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) जमीन धारणा – स्वतःच्या नावे ६.०० हेक्टर किवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असावी.
२) जातीचा दाखला – लाभार्थी हा आदिवासी शेतकरी असला पाहिजे.
३) उत्पन्नाचा दाखला – रु. २५०००/- पर्यंत उत्पन्न असावे.
संदर्भ – panchayatportals.gov.in
No comments:
Post a Comment