सटाणा, जि. नाशिक : सटाणा बाजार समितीत बुधवार (ता. १२) पासून डाळिंबाच्या भावात अचानक वाढ झाली आहे. भगव्या डाळिंबाची आवक घटल्याने किलोमागे दुपटीने भाव वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी ३० रुपये किलोने विक्री झालेल्या डाळिंबाला सर्वाधिक ६० रुपये किलोचा दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात डाळिंबाच्या आवकेत घट होत आहे.
मंगळवारी (ता. ११) २९९५ क्रेट्स इतकी आवक होती. गेल्या महिनाभरापासून चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला ३० ते ३२ रुपये प्रतिकिलोचा दर होता. आगामी काळात डाळिंबाचे दर चढेच राहण्याची शक्यता येथील प्रसिद्ध डाळिंब व्यापारी भैया रौंदळ यांनी व्यक्त केली.
सटाणा बाजार समितीसह इतर ठिकाणी डाळिंबाच्या आवकेत गेल्या सोमवारपासून तीस टक्के घट झाली. बिहार, पश्चिम बंगालमध्ये अचानक मागणी वाढल्याने ही अनपेक्षित भाववाढ झाल्याचे डाळिंब व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महिनाअखेर डाळिंबाचा दर पन्नाशी ओलांडेल असा अंदाजदेखील रौंदळ यांनी व्यक्त केला आहे.
महिनाभरापासून सटाणा बाजार समितीत सरासरी सहा ते सात हजार क्रेट्स आवक होती. मात्र, ३० ते ३५ रुपये शिवार खरेदीने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. कधीकाळी डाळिंबाचे आगर असलेल्या कसमादेमध्ये तेल्याने घाला घातल्याने सद्यःस्थितीत नगर जिल्हा डाळिंब उत्पादनात आघाडीवर आहे. या परिसरातून नाशिक बाजार समितीत होणाऱ्या डाळिंबाच्या आवकेतदेखील मोठी तूट निर्माण झाल्याने व बाहेरील राज्यात मागणी वाढल्याने डाळिंबाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

0 comments:
Post a Comment