दीघंची, जि. सांगली - राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी यंदाच्या वर्षी ४ कोटी ७ लाख निधी मंजूर झाला. यामुळे दीघंची गावातील तांत्रिक कारणामुळे बंद असलेला पाणी फिल्टर प्लॅंट पुन्हा सुरू झाला. यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू झाल्याने गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून गाव टॅंकरमुक्त झाले.
आटपाडी तालुक्यातील दीघंची १६ हजार लोकसंख्या असलेले गाव. गावापासून जवळ असलेल्या निंबाळकर आणि महाडीकवाडी तलावातून गावाला पिण्याचे पाणी दिले जाते. हा भाग तसा दुष्काळी, यामुळे पाणी टंचाईला सातत्याने सामोरे जावे लागत होते. शुद्ध पाणी मिळण्यासाठी तत्कालिक ग्रामविकासमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी २ कोटी ३० लाख रुपये देऊन राष्ट्रीय पेयजल योजना सुरू केली. या योजनेला फिल्टर प्लॅंट बसविण्यात आला. सुरवातीच्या काळात हा प्लॅंट सुरू होता. पण पाणी टंचाई आणि तांत्रिक अडचणीमुळे हा फिल्टर प्लॅंट बंद होता. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सरपंच आणि उपसरंपच यांनी पुढाकार घेतला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तलावानजिक विहिरी घेतल्या. त्यामुळे पाणी प्रश्न मार्गी लागला पण तो काही काळासाठीच. त्यामुळे शासनाकडून गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू केले. दररोज टॅंकरच्या १५ खेपा व्हायच्या.
अलीकडे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी गावात आले आणि पाणी प्रश्न कायमचा सुटला. त्यामुळे बंद असलेला प्लॅंट सुरू करण्याची गावकरी एकत्र आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाढीव योजनासाठी प्रस्ताव सादर केल्याने ४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. आता ही योजना सुरू झाल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळू लागले आहे. गावचे सरपंच अमोल मोरे यांनी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून गाव टॅंकरमुक्त करण्यात यश मिळविले.

No comments:
Post a Comment