ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची निर्मिती प्रामुख्याने केली जाते. यामध्ये अधिक काळ रोपे राहिल्यास मुळांच्या गुंडाळ्या होणे (कॉयलिंग असे म्हणतात.) ही समस्या प्राधान्याने दिसून येते. याचा फटका पुनर्लागवड केल्यानंतरही दीर्घकाळ दिसून येतो. हे टाळण्यासाठी डेन्मार्क येथील एलेपॉट एअर या कंपनीने कागदापासून खास ट्रे विकसित केले आहे. या कागदी ट्रेमध्ये हवा खेळती राहणे आणि निचरा या दृष्टीने विशेष रचना केली असून, ट्रेमधील कप्प्यांचा आकारही मोठा ठेवला आहे. या संशोधन आरेखनासाठी कंपनीने पेटंटसाठी अर्ज केलेला आहे.
एलेपॉट एअर ट्रेमुळे रोपांच्या निर्मितीची कार्यक्षमता वाढते. स्वयंचलित यंत्रणेमध्ये किंवा हाताळणीमध्येही हे ट्रे सुरक्षित राहतात. या साऱ्या गुणधर्मांचा फायदा मोठ्या आकाराच्या रोपांच्या निर्मितीसाठी होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
फळझाडे, नट्स, सुशोभीकरणाची झुडपे आणि मोठ्या कुंड्यांतील झाडे यासाठी मोठ्या आकाराच्या ७० ते १२० मि.मी. व्यासाच्या ट्रे निर्मितीचे ध्येय ठेवण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील उत्तर अमेरिका, ब्लॅकमोअर कंपनी अशा विविध भागीदारांसह नव्या ट्रेचा कार्यक्रम आखण्यात येत आहे.
असे होतील याचे फायदे
- मुळांच्या गाठी तयार होणे, गुंडाळ्या होणे रोखले जाते.
- मुळांची आवश्यकतेनुसार छाटणी करता येते.
- मुळातील दोष कमी होण्यास मदत होते.
मुळांची हवेत छाटणी (एअर प्रुनिंग) शक्य ः
सामान्यतः प्लॅस्टिक पिशव्या किंवा कुंड्यांमध्ये मुळांना बाहेर जाण्यासाठी जागा नसते. त्यामुळे त्यांच्या गुंडाळ्या होतात. नव्या ट्रेमध्ये वाढत्या मुळांना अटकाव होत नाही. ती सरळ खाली जाऊ शकतात. अगदी काही महिन्यांपर्यंत एलेपॉट एअर ट्रेमध्ये ठेवता येते. रोपांच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म वातावरण तयार होते. आवश्यकतेनुसार मुळांची छाटणी करून आकार देता येत असल्याचे ब्लॅकमोअरचे लार्स पीटर जेन्सेन यांनी सांगितले. रोपवाटिकेमध्ये वाढलेली रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर धक्का बसून ती सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे मुळांमध्ये दोष निर्माण होतात. मात्र, चाचण्यांमध्ये एलेपॉटमध्ये मरतुकीचा दर कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले.

0 comments:
Post a Comment