Thursday, October 25, 2018

पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा लक्ष

या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव वाढले. गवार बी मधील वाढ सर्वाधिक होती (६ टक्के). सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत हळदीचे भाव घसरतील. इतरांचे भाव वाढतील.

नोव्हेंबरपासून खरीप पिकांची आवक सुरू होईल. सध्या सणामुळे सर्वच वस्तूंची मागणी वाढत आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजार भाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगला देशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापार संघर्ष वाढत आहे. भारतास त्याचा फायदा होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम घसरत होत्या (रु. १,४२४ ते रु. १,३५७). नंतर त्या वाढत महिन्याअखेर रु. १,३९० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. १,४४० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,४३२ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४४९ वर आहेत. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव ०.९ टक्क्यांनी वाढून रु. १,५३५ वर आला आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). मागणी चांगली आहे. भाव वाढण्याची शक्यता आहे.

साखर
साखरेच्या (डिसेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,०३६ ते रु. ३,१३९). या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,१५१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,११६ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१५१ वर आल्या आहेत. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,२३३ व रु. ३,३६७ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,२७४ वर आल्या होत्यां. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घटून रु. ३,२४५ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,२३७ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले तरी निर्यात मागणी अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑक्टोबर नंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. २३ ऑक्टोबर रोजी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च डिलिवरी साठी अनुक्रमे रु. ३,२९१, ३,३३५, ३,३८२ व ३,४२९ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर)च्या किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ६,९२४ ते रु. ६,६५२). गेल्या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,५०८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,६०० वर आल्या आहेत. आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,९०७ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.५ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,५२६). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाऊस चांगला झाला असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम वाढत रु. २,०६० पर्यंत गेल्या; नंतर त्या महिनाअखेर रु. २,०४२ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या रु. २,०३० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०२८ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०९८). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४८० ते रु. ४,३२५). या सप्ताहात त्या ६ टक्क्यांनी वाढून रु. ४,६६७ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३८६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती ९.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,८१०). या वर्षी उत्पादन जरी कमी असले तरी तेल उद्योगाकडून मागणीसुद्धा कमी असेल अशी भावना आहे. किमतींत वाढ अपेक्षित आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,९७१ व रु. ४,१३६ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,०९८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,११६ वर स्थिर आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.७ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,१८७). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सणामुळे या पुढील दिवसांत मागणी वाढेल. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

कापूस
एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. २२,९३० ते रु. २१,८७०). गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. २२,६७० वर आल्या होत्या. या सप्ताहात सुद्धा त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. २२,७१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,३५० वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २३,१४० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक उशिरा होईल असा अंदाज आहे. पुढील वर्षी चीन भारतावर अधिक अवलंबून असेल असा अंदाज आहे. त्यांचा परिणाम कापसाच्या किमतींवर होत आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).
arun.cqr@gmail.com

News Item ID: 
18-news_story-1540471733
Mobile Device Headline: 
पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा लक्ष
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture story in marathi, forward market for agriculture commodities
Author Type: 
External Author
डॉ. अरुण कुलकर्णी
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment