Pages - Menu

Monday, February 24, 2020

वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...

तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्‍वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात.

उन्हाळ्यामध्ये वाहतुकीदरम्यान शेळ्या, मेंढ्यांमध्ये उष्णतेचा ताण निर्माण होतो. याकरिता वाहनातील वायुवीजनाबाबत अतिरिक्त दक्षता घ्यावी. वाहनामध्ये हवेचा प्रवाह खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.

वाहनामध्ये शेळ्यांची जास्त गर्दी होऊ देऊ नये. प्रवास सुरू केल्यानंतर प्रथम एक तासाने व नंतर प्रत्येक २ ते ३ तासांनी शेळ्यांची तपासणी करावी. वाहतुकीदरम्यान वाहन थांबवल्यास सावलीच्या ठिकाणी थांबवावे. उन्हामध्ये वाहन थांबवू नये. वाहतूक करतेवेळी तापमान व सापेक्ष आर्द्रता विचारात घेऊन वाहतूक करावी. वाहतुकीसाठी २५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान अनुकूल असते.

तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्‍वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात. अशा वेळी शेळ्यांच्या डोक्यावर गार पाणी टाकल्यास शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

वाहतुकीनंतर घ्यावयाची दक्षता

  • वाहतुकीनंतर शेळ्या,मेंढ्या वाहनामधून काळजीपूर्वक उतरवून घ्याव्यात.
     
  • वाहतुकीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यानचा कालावधी शेळ्यांकरिता फार तणावजणक असतो. याचा परिणाम शेळ्यांच्या प्रतिकारशक्ती वर होतो.
     
  • वाहतुकीचा कालावधी १२ तासांचा असल्यास, वाहतुकीनंतरचे साधारणपणे ३ दिवस शेळ्या तणावग्रस्त स्थितीत राहतात. यादरम्यान शेळ्यांमध्ये शारीरिक तापमानामध्ये वाढ, हृदयाचे ठोके तसेच श्‍वास घेण्याचा वेग वाढणे इ. लक्षणे दिसतात. या कालावधीत शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. शेळ्यांना प्रामुख्याने श्‍वसन संस्थेचे आजार जसे निमोनिया, घटसर्प, पीपीआर इ. यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
     
  • वाहतुकीनंतर शेळ्यांना तीन दिवस इलेक्ट्रोल पावडर तसेच १० लिटर पाण्यामध्ये १ किलो गुळाचे मिश्रण करून प्रति शेळी ५०० मि.ली. पाजावे.
     
  • वाहतुकीचा ताण कमी करण्याकरिता शेळ्यांना ताणविरोधी औषधे जसे व्हिटामिन-सी, व्हिटामिन-एडी ३ यासोबतच वेदनाशामक व प्रतिजैविक औषधे द्यावीत.

संपर्कः डॉ. सचिन टेकाडे, ९३७०३४००५८
(सहायक संचालक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)

News Item ID: 
820-news_story-1582548160
Mobile Device Headline: 
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi transportation of sheep and goats
Author Type: 
External Author
डॉ. सचिन टेकाडे
Search Functional Tags: 
उष्माघात, तण, weed, महाराष्ट्र, Maharashtra, पुणे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
transportation, sheep, goats
Meta Description: 
transportation of ships and goats तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्‍वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात.

No comments:

Post a Comment