जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्विंटल आवक झाली. त्यांना २२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
जालना बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची केवळ ६ क्विंटल आवक झाली. तिला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जवळपास २०० कॅरेट आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५० ते १५० रुपये प्रतिकॅरेट राहिले. आल्याची आवक २ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
पपईची आवक २ क्विंटल झाली. तिचा दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या चिकूचे दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टरबुजाची आवक १० क्विंटल झाली. त्यांना १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
सफरचंदांची आवक ६ क्विंटल झाली. त्यांचे दर ४५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५०० क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बटाट्याची आवक ७० क्विंटल झाली. या बटाट्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
मेथी ७५ रुपये प्रतिशेकडा
मेथीची जवळपास ७०० जुड्यांची आवक झाली. तिला ७५ रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक ६०० जुड्या झाली. तिचा दर ५० रुपये प्रतिशेकडा राहिला. पालकाची आवक ६०० जुड्यांची झाली. तर, या पालकाला ६० ते ७० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती जालना बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

No comments:
Post a Comment