Pages - Menu

Friday, February 21, 2020

अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन

नवी दिल्ली - देशात यंदा खरीप हंगामात मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान आणि रब्बीच्या पेरण्यांना झालेला उशीर ही संकटे असतानाही यंदाच्या पीक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी दोन हजार ९१९.५ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादन २.४ टक्क्यांनी वाढणार आहे, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या दुसऱ्या पीक उत्पादन अंदाज अहवालातून मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात सर्वाधिक उत्पादित होणारे आणि आहारातील मुख्य अन्न असलेल्या गहू आणि भाताचे उत्पादनही यंदा उच्चांकी पातळीवर पोचले आहे. यंदा सरकारने रब्बी हंगामात गहू उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत ४ टक्के वाढ होऊन एक हजार ४९३ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच, सरकारने सप्टेंबर महिन्यात व्यक्त केलेल्या एक हजार ४०५.७ लाख टन खरीप उत्पादनाच्या अंदाजात वाढ करून एक हजार ४२३.६ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गहू उत्पादनातही वाढ
सरकारने गहू उत्पादनात २.५ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा गव्हाचे उत्पादन एक हजार ६२ लाख टनांवर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, मार्केटच्या अंदाजानुसार गव्हाचे उत्पादन एक हजार ८० लाख टन होईल. भाताचे उत्पादनही वाढणार असल्याचे सरकारने अहवालात म्हटले आहे. भाताच्या उत्पादनात एक टक्क्याने वाढ होऊन उत्पादन एक हजार १७५ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात भाताचे उत्पादन १४४ लाख टन झाले होते यंदा रब्बीत १५५ लाख टन भात होण्याचा अंदाज आहे.

तेलबिया उत्पादनात आठ टक्के वाढ
सरकारने यंदाच्या पीक हंगामात तेलबिया उत्पादनात ८ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तेलबिया उत्पादन ३४२ लाख टन होईल. सोयाबीन उत्पादनाचा सुरुवातीचा १३५ लाख टनाचा अंदाज वाढवीत १३६ लाख उत्पादन होणार असल्याचे म्हटले आहे. मोहरी उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत घटणार आहे. गेल्यावर्षी मोहरीचे ९३ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा ९१ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.

News Item ID:
599-news_story-1582272988
Mobile Device Headline:
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन
Appearance Status Tags:
Mobile Body:

Vertical Image:
English Headline:
This years record production of cereals
सकाळ वृत्तसेवा
Author Type:
Search Functional Tags:
खरीप, अतिवृष्टी, मंत्रालय, ऍप, गहू, wheat, रब्बी हंगाम
Twitter Publish:
Send as Notification:

No comments:

Post a Comment