Pages - Menu

Monday, February 24, 2020

नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट 

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात आल्याची आवक १९५ क्विंटल झाली. त्यास ३५००ते ४५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील सप्ताहात आल्याची आवक १४१ क्विंटल झाली होती. त्यास ५०००ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र, दरात क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक ७३३६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७७० ते २३५० दर होते. बटाट्याची आवक ९४३६ क्विंटल झाली. प्रतिक्विंटल दर ७०० ते १७०० होते. लसणाची आवक ७०३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते १४५०० बाजारभाव मिळाला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ९५६५ क्विंटल झाली. आवक वाढल्याने दर कमी झाले. वालपापडीला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० दर मिळाला. तर घेवड्याला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० दर मिळाला. हिरवी मिरचीची आवक ७८७ क्विंटल झाली. प्रतिक्विंटलला १५००ते २५०० रुपये दर मिळाला. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभावात घट झाली.लवंगी मिरचीला १५०० ते २५०० तर ज्वाला मिरचीला १५०० ते २२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक ९४५ क्विंटल झाली. चालू सप्ताहात वाटण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून बाजारभाव स्थिर आहेत. त्यास १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ८० ते १५०, वांगी ५० ते २००, फ्लॉवर ४० ते ६० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ४० ते ६० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची ५० ते १४० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ५० ते २००, कारले २०० ते ३५०, गिलके ४० ते १५०, भेंडी १२० ते २४० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला १५० ते ३००, लिंबू १६० ते ३८० दर मिळाला. 

फळांमध्ये तेजी कायम
फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ५०० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १००० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ५१० क्विंटल झाली. तिला १००० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला.डाळिंबाची आवक १५४३ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ६०० ते ६७५० व मृदुला वाणास ७५० ते ८८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक ११९० क्विंटल झाली. त्यास ९०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. खरबुजाची आवक ५४० क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नारळाची आवक १००९ क्विंटल झाली. त्यास २२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

भाजीपाल्याला प्रति १०० जुड्यांचा दर असा
कोथिंबीर ः ४० ० ते ३४००
मेथी ः २०० ते १०००
शेपू ः ३०० ते १४००
कांदापात ः २५० ते १५५०
पालक ः १०० ते २००

ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा
 
News Item ID: 
820-news_story-1582555797
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट 
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Nashik market in Ginger rate diereses
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, टोमॅटो, लिंबू, Lemon, Sweet lime, डाळिंब, कांदा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nashik market in Ginger rate diereses
Meta Description: 
Nashik market in Ginger rate diereses नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात आल्याची आवक १९५ क्विंटल झाली. त्यास ३५००ते ४५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील सप्ताहात आल्याची आवक १४१ क्विंटल झाली होती. त्यास ५०००ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र, दरात क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

No comments:

Post a Comment