माती परीक्षण अहवालानुसार खरबूज पिकात खत नियोजन करावे. फळधारणेनंतर व फळ वाढेपर्यंत एक सारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळ परिपक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी करावे. त्यामुळे फळांमधील साखरेचे प्रमाण व गराचे प्रमाण उत्तम राहते.
खरबूज लागवडीसाठी ठिबक सिंचन पद्धत अवलंबवावी. साधारणतः सात फुटांवर लॅटरल असावी. इनलाईन ड्रिपर १.५ फुटावर असावा. या पद्धतीमध्ये चोकअप होण्याचा त्रास नसतो. ठिबक सिंचनासाठी ३० सेमी च्या अंतरावर इमीटर (ठिबक) असलेल्या इनलाईन लॅट्ररल्स (दोन लिटर प्रति तास क्षमतेच्या) वापराव्यात. फळधारणेनंतर एक सारख्या प्रमाणात पाणी द्यावे.
पाण्याची बचत, तण नियंत्रण, खतांची बचत तसेच काहीशा प्रमाणात किडींचे नियंत्रण होण्यासाठी खरबूज लागवडीपूर्वी मल्चिंग पेपर अंथरावा. गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर १.२५ मीटर रुंद आणि ४०० मीटर लांब प्रती रोल (पेपरची जाडी ३० मायक्रॉन) मल्चिंग पेपर अंथरावा. यामुळे जमिनीचे तापमान, आर्द्रता अनुकूल राहून पांढऱ्या मुळांची वाढ उत्तम होते. एकरी पेपरचे ४-५ रोल लागतात.
खत व्यवस्थापन
- लागवडीपूर्वी ५०ः५०ः५० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. माती परीक्षण अहवालानुसार खत नियोजन करावे.
टीपः जमिनीच्या मगदुरानुसार व माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा द्यावी.
छाटणी (प्रुनिंग)
- वेलीची वाढ एक सारखी होऊन पानाचा आकार मोठा होण्यासाठी, कीड व रोगास वेलाची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नको असलेला वेलीचा भाग म्हणजे मध्यभागाचा शेंडा, अनावश्यक बगल छाटून टाकणे गरजेचे असते. यामुळे फळांचा आकार, रंग, चव, आकर्षकपणा व वजन यामध्ये फायदेशीर बदल होतो.
पाणी व्यवस्थापन
- मल्चिंगवर लागवड असेल तर ठिबकच्या सहाय्याने जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचे नियोजन करावे. फळधारणेनंतर व फळ वाढेपर्यंत एक सारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळ परिपक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी करावे. त्यामुळे फळांमधील साखरेचे प्रमाण व गराचे प्रमाण उत्तम राहते. पिकाचा कालावधी ८०-१०० दिवसांचा असतो.
फळांची काढणी व उत्पादन
- फळ पिकू लागल्यावर फळांचा मधूर वास येतो. फळांच्या सालीचा रंग बदलतो. फळे जास्त जाळीदार होतात. जाळीच्या मधील जागा पिवळसर होते.
- सुधारीत पद्धतीने लागवड केल्यास २०-२५ टन प्रति हेक्टरी खरबुजाचे उत्पादन मिळते.
- कृषी विज्ञान केंद्र, बारामतीने २०११-२०१२ पासून खरबूज लागवडीमध्ये रोपवाटिका मल्चिंग बेडवर लागवड ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन या पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर खरबुजाचे एकरी १०-१२ टन इतके उत्पादन घेतले जाते.
संपर्कः वाय. एल. जगदाळे, ०२११२ २५५४२७
(कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)

No comments:
Post a Comment