लहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी शेवगा फायदेशीर आहे. पानांपासून बनवलेली पावडर हृदयविकार, मधुमेहावर गुणकारी आहे. शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते.
शेवग्याच्या शेंगा, पाने, फूल, खोड या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. शेंगा व पानांमध्ये मुबलक असून त्यामध्ये आरोग्यदायी पोषणतत्त्वे आहे. वाळलेल्या पानांची पावडर करून वापरली जाते.
या पावडरीला प्रक्रिया तसेच औषधी क्षेत्रात मागणी आहे. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. आहारामध्ये शेवग्याचा वापर केल्यास शरीरास नैसर्गिकरित्या कॅल्शिअम मिळते.
शेवगा पानांच्या पावडरमधील पोषणतत्त्वे (१०० ग्रॅम)
| पोषक तत्त्वे | प्रमाण |
| ऊर्जा | २०५ किलो कॅलरी |
| प्रथिने | १६.५५ ग्रॅम |
| कर्बोदके | ५०.४ ग्रॅम |
| तंतू | ४.४० ग्रॅम |
| कॅल्शिअम | ५६२०.६२ मिलिग्रॅम |
| मॅग्नेशिअम | ३६८ मिलिग्रॅम |
| लोह | २६.५१ मिलिग्रॅम |
| जीवनसत्त्व -अ | ६८६८.६६ मिलिग्रॅम |
| जीवनसत्त्व ब-१ | २.६४ मिलिग्रॅम |
| जीवनसत्त्व ब-२ | २०.५ मिलिग्रॅम |
| जीवनसत्त्व ब-३ | ८.२ मिलिग्रॅम |
| जीवनसत्त्व क | १८.२१ मिलिग्रॅम |
| जीवनसत्त्व इ | ११३ मिलिग्रॅम |
आरोग्यदायी फायदे
- वाळलेल्या पानांमध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते. लहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात आणि चांगली होण्यासाठी शेवगा फायदेशीर आहे.
- शेवग्यामध्ये जीवनसत्त्वे व खनिजे मुबलक प्रमाणात असतात. गर्भवती महिलांच्या आहारात शेवग्याचा वापर केल्यास प्रसूती दरम्यान होणारा त्रास कमी होतो.
- पानांमध्ये असलेले क्लोरोजेनिक आम्ल वजन कमी करण्यास मदत करते.
- शेवगा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे कुपोषणावर मात करण्यास मदत होते.
- शेवग्यामध्ये असलेल्या अमिनो आम्लामुळे कॅरोटीन नावाचे प्रोटीन तयार होते. कॅरोटीनमुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
- पानांपासून बनवलेली पावडर हृदयविकार, मधुमेह या आजारांवर गुणकारी आहे.
- जीवनसत्त्व अ च्या मुबलकेमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. बी जीवनसत्त्वामुळे पचनक्रिया सुधारते.
- पावडरमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून ॲनिमिया आजारावर फायदेशीर आहे. रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
- पावडरमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
संपर्कः श्रीमती रोहिणी भरड, ८१४९८२६०१३
(गृह विज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई, जि. बीड)

0 comments:
Post a Comment