औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २९) द्राक्षांची १५२ क्विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी मोसंबीची १४५ क्विंटल आवक झाली. त्यांना किमान ६०० ते कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ७ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर १००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. पेरूची आवक १२ क्विंटल झाली. त्यांना ६०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३० क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांचे दर ४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २८ क्विंटल आवक झालेल्या टरबुजाचा दर ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३० क्विंटल आवक झालेल्या खरबूजला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
मेथीची १७ हजार जुड्यांची आवक झाली. तिला दर किमान ९० ते कमाल ११० रुपये प्रतिशेकडा राहिले. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ७० ते १८० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २४ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ८० ते २०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १०५ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
कांद्यांची आवक ६९८ क्विंटल, तर दर ५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १७१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक २९ क्विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १५ क्विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
भेंडीची आवक २० क्विंटल, तर दर किमान १५०० ते कमाल २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ८ क्विंटल आवक झालेल्या वालशेंगांचा दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. काकडीची आवक ३५ क्विंटल, तर दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३५ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक १२ क्विंटल, तर दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३९ क्विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
फ्लॉवरला ३०० ते ७०० रुपये
फ्लॉवरची ३७ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ३०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक २४ क्विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १७ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर २००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. वाटाण्याची आवक १२० क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment