हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने प्रत्यक्षात मालाचा दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी पाहिल्या जातात, त्यानुसार हळद पॉलिश करणे आणि हळदीची प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शिजवलेली हळद ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळविल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत पाणी अथवा पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पूर्ण वाळलेली हळद व अर्धवट वाळलेली हळद एकत्र मिसळू देऊ नये. अधून मधून हात देताना कमी शिजलेली, जादा फुगीर दिसत असलेली हळकुंडे त्वरित वेचून बाजूला काढावीत. अशा हळकुंडांना किमान चार वेळा जास्त ऊन द्यावे लागते. वाळवलेली हळद नंतर पॉलिश करावी.
हळद पॉलिश करणे
हळद शिजविताना काहिलीतील पाण्यातील मातीचा थर हळदीवर बसलेला असतो. तसेच जातीपरत्वे हळदीची साल कमी जास्त जाडीची असते. ही साल हळद शिजविल्यानंतर काळपट दिसते अथवा चिरते. साल पॉलिश करून काढल्याशिवाय हळद आकर्षक दिसत नाही. परिणामी हळदीला बाजारभाव चांगला मिळत नाही, म्हणून हळद पॉलिश करणे गरजेचे असते. हळद पॉलिश करण्यासाठी लोखंडी बॅरेल वापरावा. हे बॅरल एका स्टॅडवर ठेवावे. हळद भरण्यासाठी बॅरेलला ६X९ इंचाचे तोंड ठेवावे. या बॅरेलवर १० ते १५ सें.मी. अंतरावर ३ ते ६ सें. मी. लांबीची व १ ते १.५ सें.मी. रुंदीची छिद्रे छन्नीने पाडून घ्यावीत. छिद्र पडलेला आतील भाग खडबडीत होतो. पिंपाच्या मधून एक लोखंडी दांडा बसवून त्याला पिंपाच्या बाहेर गेल्यानंतर दोन्ही बाजूला हॅन्डलसारखा आकार दिल्यावर दोन व्यक्तींना ड्रम स्टॅंडवर ठेवल्यावर गोलाकार फिरविता येतो. अशा पिंपात पॉलिश करावयाची हळद टाकून त्यामध्ये घर्षणासाठी अणकुचीदार ५ ते ७ दगड टाकून ड्रम फिरविल्यास आतील हळद जलद गतीने पॉलिश होते. या पद्धतीत दोन मजूर एका तासात २५ ते ३० किलो हळद पॉलिश करतात. याच तत्त्वाचा वापर करून इलेक्ट्रिक मोटारीवर चालणारे २ ते १० क्विंटल वटल क्षमतेपर्यंतचे हळद पॉलिश ड्रम बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वाळलेल्या हळदीचे उत्पादन ओल्या हळदीच्या २० ते २५ टक्के इतके मिळते.
हळदीची प्रतवारी
पॉलिश केल्यानंतर हळकुंडांची किमान चार प्रकारांमध्ये प्रतवारी करणे अत्यंत आवश्यक आहे.
- जाड, लांब हळकुंडे (३ ते ५ से.मी. लांबी)
- मध्यम जाड हळकुंडे (२ ते ३ से.मी. लांबी)
- लहान आकाराची हळकुंडे (२ से.मी. पेक्षा कमी लांबी)
- लहान माती व खडेविरहीत कणी
अशा वेगवेगळ्या प्रकारात हळदीची प्रतवारी करून चांगल्या बारदान्यामध्ये पॅकिंग करावे, यामध्ये सोरेगड्डे व शिजवलेले गड्डे हे वेगवेगळ्या ठिकाणी पॅकिंग करावे.
संपर्क ः डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४
(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली)

No comments:
Post a Comment