डाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते. डाळिंबाचे फळ रुचकर असते. डाळिंबाची साल व फळाचा रस औषधी असतो. सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. डाळिंबाच्या औषधी गुणधर्माबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते.
औषधी उपयोग
- डाळिंब पित्तशामक म्हणून उत्तम काम करते. विशेषतः उन्हाळ्यात थकवा, पित्ताचा त्रास हमखास जाणवतो. अशावेळी डाळिंबाच्या रसामध्ये साखर घालून सेवन करावे. त्यामुळे आराम मिळतो.
- तापामध्ये, तापानंतरच्या थकव्यामध्ये डाळिंबाचे दाणे खाल्याने उत्साह वाढतो. पित्ताचे शमन होते.
- लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, वावडिंग आणि डाळिंबाची साल उकळून त्याचा काढा करून द्यावा.
- उलट्या, अजीर्ण, अपचन यासाठी डाळिंब रसाचे सेवन करावे.
- पोट बिघडल्यास डाळिंबाची साल, सुंठ पावडर, जिरे पाण्यात चांगले उकळून त्याचे सेवन करावे. जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास वरील मिश्रणात जायफळ उगाळून घालावे. डाळिंबाची साल अतिसारासाठी उपाय म्हणून उत्तम कार्य करते.
- जुनाट पित्त, जळजळ यासाठी डाळिंबापासून बनविलेले ‘दाडीमादी घृत' नावाचे औषध उत्तम कार्य करते. घृत म्हणजे तूप! याचे सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.
- थकवा, थोड्या श्रमानेही दम लागणे, रक्त कमी असणे यासाठी पोटात औषधे जरूर घ्यावीत. पण त्यासोबतच रोज १ डाळिंब जरूर खावे.
- वारंवार पोट बिघडणे, अजीर्ण, आव पडणे अशा त्रासामध्ये डाळिंबाची साल उगाळून द्यावी.
पथ्य
- शिळे व तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करावे. या पदार्थांच्या सेवनाने पित्ताचा त्रास उद्भवतो.
- जेवणाच्या वेळा पाळाव्यात. उशिरा जेवण करणे टाळावे.
काळजी
- वारंवार पित्त, जळजळ, पोटात दुखणे, अजीर्ण असे त्रास सतत होत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
- महिलांनी त्यांना होणाऱ्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. सहज मिळणारे डाळिंब औषधी म्हणून काम करते, याची जाणीव ठेवून तसा उपयोग करावा.
संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७
News Item ID:
820-news_story-1582365583
Mobile Device Headline:
गुणकारी डाळिंब
Mobile Body:

English Headline:
agriculture news in marathi health benefits of pomegranate
Twitter Publish:

0 comments:
Post a Comment