भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी काठ्या उभारण्याचा त्रास व मजुरी आता कमी होणार आहे. पट्टणकोडोली (जि. कोल्हापूर) येथील संदीप व सुदर्शन या जाधव बंधूंनी आपली कल्पकता वापरून ट्रॅक्टरचलित यंत्र व त्याला लोखंडी साहित्य, पुली व वायररोप जोडून यांत्रिक पध्दतीने काठ्या रोवण्याचे साधेसोपे, कमी खर्चिक तंत्र विकसित केले आहे. सुमारे पाच हजार रुपयांचा खर्च त्याआधारे निम्म्याहून कमी केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) हे गाव बिरदेव यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. याच गावात बापू व महादेव या जाधव बंधूंची एकत्रित नऊ एकर शेती आहे. ऊस व भाजीपाला ही त्यांची मुख्य पिके आहेत. वर्षभर ते टोमॅटो, काकडी, कलिंगड, वांगी अशी पिके आलटून पालटून घेतात. बाजार समितीसोबतच स्थानिक ठिकाणीदेखील या शेतमालाची विक्री होते. घरच्या सदस्यांचा सहभाग हे कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच शेतीत प्रगती करणे त्यांना शक्य झाले आहे.
नव्या पिढीचा यांत्रिकीकरणावर भर
सध्या घरच्या शेतीची जबाबदारी महादेव यांची मुले संदीप (वय ३४) व सुदर्शन (वय ३०) यांच्याकडे
आहे. दोघेही कला शाखेचे पदवीधर. तेही शेतीच करतात. मात्र अलीकडे मजूरटंचाईचा प्रश्न त्यांच्याकडेही बिकट झाला होता. त्यातच जवळ ‘एमआयडीसी’ असल्याने हे संकट अजूनच तीव्र झाले होते. त्यामुळेच हे जाधव बंधू यांत्रिकीकरणाकडे वळले. त्यातूनच विविध यंत्रे हाताळणे, त्यात नव्या रचना करणे, आपल्या शेतीच्या गरजेनुसार त्यात बदल करून पाहण्याची आवड त्यांना लागली. दरवर्षी कोणते ना कोणते यंत्र विकसित करायचे हे ठरूनच गेलेले. अगदी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रेरणा घ्यावी असे त्यांचे यंत्रांतील कौशल्य आहे.
काठ्या रोवणीचे तंत्र
जाधव कुटुंबीयांकडे शेतीकामासाठी ट्रॅक्टर आहे. तीन वर्षांपूर्वी ट्रॅक्टरचलित यंत्राच्या माध्यमातून पॉली मल्चिंग अंथरण्याचे यंत्र त्यांनी विकसित केले होते. आता त्याच्या पुढे जाऊन शेतात काठ्या रोवण्याचे तंत्र त्यनी विकसित केले आहे. जाधव यांची भाजीपाला शेती आहे. त्यात दोडका, कारली, टोमॅटो अशी पिके ते घेतात. या पिकांत या तंत्राचा वापर त्यांना करणे शक्य झाले आहे.
- हे तंत्र पुढीलप्रमाणे आहे.
- ट्रॅक्टरच्या मागे हायड्रॉलिक यंत्रणा असते किंवा जिथे ट्रॉली जोडली जाते त्याठिकाणी बदल करण्यात आले.
- या ठिकाणी दोन लोखंडी सी चॅनेल्स बसविण्यात आले.
- दोन लाल रंगाच्या लोखंडी पट्ट्या व त्यांना जोडणारी ठराविक अंतरावर छिद्रे असणारी लोखंडी पट्टी अशी या तंत्रामागील रचना आहे.
- छिद्रे असलेल्या लोखंडी पट्टीच्या पुढे गोल आकाराची लोखंडी चकती आहे. रसवंतीच्या बेल्टसाठी बसवण्यात येणाऱ्या पुलीसारखेच काम याद्वारे होते. पुलीची रुंदी सहा इंच आहे.
- या पुलीतून सात फूट लांबीचा व १० एमएम जाडीचा वायररोप नेण्यात आला आहे. फुली सहा इंच रुंदीची आहे. रोप फुलीवरून घेऊन काठीला लावण्यात येता.
- हायड्रॉलीक यंत्रणा उचलल्यानंतर पुली फिरते. त्याला जोडलेल्या काठीला दाब बसून ती
- जमिनीत दीड फुटापर्यंत खोल रोवली जाते.
- हे तंत्र वापरण्यासाठी साधारणत: पंधराशे रुपयांचा खर्च आला आहे. लोखंडी चॅनेल, पुली, वायररोप
- यांचाच काय तो खर्च येतो. आपल्या दोन एकरांत जाधव यांनी यंदा हा प्रयोग करुन आर्थिक बचत केली आहे. भाजीपाला उत्पादकांसाठी नवा मार्ग दाखविला आहे.
एक काठीसाठी एक मिनीट
पारंपरिक पद्धतीत पहारीच्या साह्याने काठी रोवण्याचे काम केले जाते. यात खड्डा काढणे आणि पुन्हा हाताने ताकद वापरून काठी खोवणे या प्रक्रियेला वेळ आणि मजूरही जास्त लागतात. मात्र जाधव यांनी विकसित केलेल्या तंत्रात एक काठी रोवायला एक मिनिटाचा कालावधी लागतो. ट्रक्टरचालक आणि मागे काठ्या रोवण्यासाठी बसलेली व्यक्ती अशा दोन व्यक्तींमध्ये हे काम होते. ट्रॅक्टरच्या गार्डवर एका सरीसाठी लागणाऱ्या काठ्या बसू शकतात. तिथून एक काठी घ्यायची व ती पुढे रोवत जायची असे तंत्र वापरायचे आहे.
नव्या तंत्राचा फायदा
- पारंपरिक पद्धतीत एका एकरांत काठ्या रोवण्यासाठी किमान चार दिवस लागतात. मात्र नव्या तंत्रात हे काम केवळ दोन दिवसांत पर्ण होते.
- यात ट्रॅक्टरचालक व अन्य व्यक्ती अशा दोघांची दिवसाची एकूण मजुरी पाचशे रुपयांपर्यंत व डिझेल एकरी ५०० रुपये एवढ्या रकमेत हे काम पूर्ण होते. त्यातही मागे बसणारी व्यक्ती घरचीच असेल तर हा खर्च अजून कमी होतो. एरवी तारा-काठ्या रोवून देण्यासाठी कंत्राट घेणारी व्यक्ती एकरी पाचहजार ते साडेपाच हजार रुपये घेत असल्याचे सुदर्शन सांगतात.
- विशेष म्हणजे शारीरिक कष्टांची मोठी बचत होते.
- या पध्दतीत रोवलेल्या काठ्या अगदी घट्ट बसतात. हलत नाहीत असा अनुभवही जाधव बंधू विषद करतात.
प्रतिक्रिया
शेतात काठ्या रोवण्याच्या परदेशातील काही तंत्रांचा आम्ही यू ट्यूबच्या माध्यमातून अभ्यास केला.
मात्र आपल्या स्थानिक गरजेनुसार कमी वेळेत व श्रमात असे तंत्र विकसित करण्याची गरज होती.
त्यात आम्हाला यश आले आहे. आम्ही सातत्याने नावीन्याचा शोध घेतो. ठीकठिकाणची यंत्रे पाहून स्थानिक पातळीवर त्यात बदल करता येइल का, याबाबत विचार विनिमय सुरू असतो.
ॲग्रोवनमध्ये आमच्या मल्चिंग पेपर अंथरण्याच्या यंत्रची माहिती आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. फलटण येथे असे यंत्र आम्ही दिलेही आहे.
सुदर्शन जाधव - ९४०४९७३५३८

No comments:
Post a Comment