जळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन होईल, अशी स्थिती असून, बाजारात दर दबावात आहेत. शासकीय खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करून बाजारात हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे. शिवार खरेदीत ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
मागील हंगामात उत्पादन कमी असताना दर ३४०० रुपयांपर्यंत खाली आले होते. यंदाही दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खानदेशात यंदा पाऊस बऱ्यापैकी होता. यामुळे हरभऱ्याची कोरडवाहू व ओलिताखालील क्षेत्रात पेरणी झाली होती. जळगाव, धुळ्यात मिळून सुमारे एक लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
कोरडवाहू व काळ्या कसदार जमिनीत उत्पादन एकरी पाच ते सहा क्विंटल येत आहे. तर ओलिताखालील क्षेत्रात एकरी आठ क्विंटलपर्यंतचे उत्पादन येत आहे. उत्पादन चांगले येत असले तरी दर परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना हरभऱ्याचा साठा करावा लागत आहे.
धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा, जळगावमधील अमळनेर, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर येथील बाजारात हरभऱ्याची आवक वाढत आहे. जळगाव बाजारात मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ५०० क्विंटल आवक झाली. ही आवक पुढे वाढू शकेल.
हरभऱ्याला प्रतिक्विंटल कमाल ३६०० रुपये दर बाजारात मिळत आहे. तर शिवार खरेदीत ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर एजंट देत आहेत. काबुली (पांढऱ्या) हरभऱ्याला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर मिळत आहे.
शासनाने ४८७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर हरभऱ्याला जाहीर केला आहे. परंतु सध्या खरेदीसंबंधी ऑनलाइन नोंदणी जिल्ह्यात १२ केंद्रांमध्ये सुरू आहे. परंतु शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.

No comments:
Post a Comment