सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. १८) मेथी, शेपू, कोथिंबिरीची आवक काहीशी कमी राहिली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरात सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सध्या सगळीकडे ‘कोरोना''चे सावट आहे. त्याचा परिणाम बाजार समितीतील व्यवहारावरही होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आवकेत चढ-उतार होत आहेत. पण मागणीत सातत्य असल्याने दरातील तेजी टिकून आहे. बुधवारी भाज्यांची सर्वाधिक आवक स्थानिक उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट या भागांतून झाली. प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत त्यांची आवक राहिली.
मेथीला शंभर पेंढ्यासाठी किमान २५० ते कमाल ३५० रुपये, शेपूला ४०० ते ५०० रुपये आणि कोथिंबिरीला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय पालक आणि चुक्यालाही मागणी राहिली. त्यांच्या प्रत्येकी शंभर पेंढ्यांना किमान २०० ते कमाल ३०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही काहीसे टिकून राहिले. त्यांची आवक प्रत्येकी १० ते २० क्विंटलपर्यंत मर्यादितच राहिली.
वांग्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये, हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर ढोबळी मिरचीला किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर मात्र काहीसे स्थिर राहिले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आवक आणि दराची स्थिती अशीच आहे.
कांद्याला सरासरी १००० रुपये
कांद्याची आवक जेमतेम ४० ते ५० गाड्यांपर्यंतच राहिली. ‘कोरोना’च्या प्रभावामुळे बाहेरील आवक कमीच आहे. विशेषतः पुणे, नगर, उस्मानाबाद या बाहेरील जिल्ह्यांतील आवक अगदीच कमी राहिली. सर्व कांदा स्थानिक भागातूनच राहिला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला.

No comments:
Post a Comment