नागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी बाजारात संत्रा फळांनाही मागणी वाढली आहे. संत्रा मागणीवाढीत कोरोनाचा प्रभावही अनुभवला जात आहे. त्यामुळे संत्रा दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात संत्रा दर ६०० ते १६०० रुपये क्विंटल होते. या आठवड्यात संत्र्याचे दर ६०० ते २२०० रुपये क्विंटलवर पोचले. येत्या काळात चांगल्या प्रतीच्या संत्रा दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.
संत्रा दरातील घसरणीमुळे उत्पादक अस्वस्थ झाले होते. ११ ते १४ हजार रुपये प्रतिटन असा संत्र्याचा दर होता. उन्हाची तीव्रता वाढल्याने संत्रा फळांच्या वाढलेल्या मागणीमुळे दरही २२ ते २९ हजार रुपये टनांवर पोचले आहेत. संत्र्याचा आकार आणि दर्जा हे दरावर परिणाम करणारे घटक ठरतात, असे सांगण्यात आले.
संत्र्याची आवक १० हजार क्विंटलच्या घरात आहे. बाजारात मोसंबीचीदेखील नियमित आवक आहे. मोठ्या आकाराच्या फळांची सरासरी आवक ४०० क्विंटल असल्याचे सांगण्यात आले. १५०० ते १७०० रुपये क्विंटलचा दर मोसंबीला होता. गव्हाची आवक १६५ क्विंटल; तर दर १७०० ते १८५० रुपये क्विंटलचे आहेत. हरभरा दर ३३५० ते ३८०१ तर आवक ७२८ क्विंटलची होती. तुरीचे दर गेल्या आठवड्यात ४३०० ते ४९७८ रुपये; तर या आठवड्यात ४४०० ते ४९५८ रुपयांवर पोचले.
तुरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कमी झाली आहे. २८३० क्विंटल या आठवड्यात तर गेल्या आठवड्यात २६९५ क्विंटलची आवक झाली. सोयाबीनचे दर ३२५० ते ३६५० असे गेल्या आठवड्यात होते. त्यात ५० रुपयांची वाढ नोंदविण्यात येत हे दर ३७०० रुपयांवर पोचले. द्राक्ष आवक २६७ क्विंटल तर दर ५००० ते ६००० रुपये होते.
डाळिंबाची ६५० क्विंटलची आवक झाली. डाळिंबाचे दर १५०० ते ७००० रुपये याप्रमाणे राहिले. बाजारात बटाटा आवक ४५१३ क्विंटलची होती. १२०० ते १५०० रुपये क्विंटलचे दर बटाट्याला होते. लसूण आवक २२४९ तर दर २५०० ते ५००० रुपये होते. टोमॅटोची आवक ४० क्विंटल ५०० ते ६०० रुपयांचे दर राहिले.

0 comments:
Post a Comment