बेकरी पदार्थांत केक या पदार्थाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही सध्या केकला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोणत्याही समारंभासाठी केकची आॅर्डर ठरलेलीच असते. त्यामुळे केक विक्री व्यवसायात अतिशय चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
जे वणानंतर बहुतेक वेळा मिष्टान्न म्हणून केकची निवड केली जाते. खासकरून लग्न, वर्धापनदिन आणि वाढदिवस अशा औपचारिक प्रसंगी केक हा असतोच. केक बनवण्याच्या असंख्य रेसिपी आहेत. पूर्वी केक बनविण्यासाठी खूप परिश्रम घेतले जात; परंतु आता केक बनविणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया नाही, बेकिंग उपकरणे आणि केक बनविण्याच्या सोप्या पद्धतीमुळे केक कोणीही अगदी सहजपणे बनवू शकतो.
केक बनविण्याची पद्धत
केक चांगला होण्यासाठी पहिल्यांदा स्पॉंज बनविण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक असते.
साहित्य : मैदा २५ टक्के, साखर २० टक्के, मिल्क प्रोटीन ९.९६ टक्के, पाणी २८ टक्के, पामतेल ७ टक्के, व्हॅनिला इसेन्स ०.१२ टक्के, बेकिंग पावडर ८ टक्के, बेकिंग सोडा ०.१२ टक्के, सॉर्बिक आम्ल १.३ टक्के, मीठ ०.५ टक्के प्रमाणे मिश्रण करून घ्यावे.
पद्धत : मैदा शिफ्टरमधून चाळून घ्यावा. वरील सर्व साहित्य ४ ते ५ मिनिटे एकत्र मिसळून २ ते तीन वेळा चाळून घ्यावे. तयार मिश्रण केकच्या साच्यामध्ये टाकावे. बेकिंगसाठी बेकरी ओव्हनमध्ये १७० अंश सेल्सिअस तापमानाला २५ मिनिटे ठेवावे. बाहेर काढून सामान्य तापमानात थंड करावे. साचा मधून बाहेर काढून काप करावेत. स्पॉन्ज तयार झाल्यानंतर त्यावर सिरप (सॉर्बिटॉल/शुगर) स्प्रे करावे. क्रीमचा थर द्यावा (क्रीम + फ्रुट फीलिन्ग + फळांचा गर). सुगंधित क्रीमने सजावट करावी (स्पॉन्ज कोटिंग). साठवणूक ४ अंश सेल्सिअस तापमानात करावी. मागणीनुसार बाजारात
पाठवणे.
सुगंधित क्रिम बनविण्याची पद्धत ः ताजे क्रीम व्हिपिंग मिक्सरमध्ये १० ते १५ मिनिटे फिरवून घ्यावे. यामध्ये इसेन्स किंवा सुगंधी द्रव्ये, फळांचा गर गरजेनुसार मिसळावा.
केक विक्री व्यवसाय वाढविण्यासाठी
- केकचे विविध प्रकार आणि पद्धती शिकून स्वतःचे केक शॉप सुरू करता येते. बेकरी व्यवसायात स्वच्छता खूप महत्त्वाची असते. त्यामुळे स्वच्छतेचे सर्व निकष पाळून आणि केकची चांगली गुणवत्ता देऊन ग्राहकांना आकर्षित करता येते. त्यातून स्वतःचा एक वेगळा ग्राहक वर्ग निर्माण करता येतो आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होते.
- एकदा व्यवसायात जम बसल्यानंतर केकचा स्वतःचा ब्रॅंड तयार करता येतो. ब्रॅंड चांगला लोकप्रिय झाल्यानंतर एखाद्या ठिकाणचा अभ्यास करून ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन वेगवेगळ्या शहरात स्वतःची फ्रॅंचायजी सुरू करता येते.
- एकापेक्षा जास्त शहरात, तसेच पूर्ण भारतात या पद्धतीने हा व्यवसाय करता येऊ शकतो. ज्या शहरात हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्या शहराचे सर्वेक्षण करून किती फ्रॅंचायजी (शॉप) करू शकतो, त्याप्रमाणे सर्वसाधारणपणे २५ शॉप्ससाठी एक मास्टर फ्रॅंचायजी (बेकरी) असावी. या एकाच फॅक्टरीतून संपूर्ण २५ शॉप्सला बेकरी पदार्थ पुरवले जातात. अर्थात जर शहरात २५ पेक्षा जास्त शॉप्स होत असतील तर त्या शहरात आणखी एक बेकरी सुरू करता येऊ शकते. यात मालाची गुणवत्ता ही सर्व फॅक्टरीतून सारखीच असली पाहिजे.
राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७,
(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ज्ञ आहेत.)

No comments:
Post a Comment