कोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी, १३ मार्चअखेर २१० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन ५७ लाख टनांनी कमी असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी दिली.
उत्तर प्रदेश राज्याने ८३ लाख टन साखरेचे उत्पादन करून पुन्हा एकदा आघाडी घेतली असून हे उत्पादन गेल्या वर्षीच्या राज्यातील या तारखेच्या उत्पादनापेक्षा २ लाख टनाने अधिक आहे. या उलट महाराष्ट्रातील ५५ लाख टन नवे साखर उत्पादन हे गतवर्षीच्या या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा ४३ लाख टनाने कमी आहे.
कर्नाटकमधील ३३ लाख टन नवे साखर उत्पादन हेदेखील गतवर्षी या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा ९ लाख टनाने कमी आहे. गुजरातमध्ये ८ लाख टन नवे साखर उत्पादन झाले असून ते गतवर्षीच्या या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा अडीच लाख टनाने कमी आहे.
अशीच थोडी फार परिस्थिती इतर राज्यात दिसत असून, हंगामअखेर देशपातळीवरील नवे साखर उत्पादन २६५ लाख टनाइतके सीमित राहण्याचा अंदाज आहे. त्यात उत्तर प्रदेश ११८ लाख टन, महाराष्ट्र ६० लाख टन, कर्नाटक ३४ लाख टन आणि गुजरात ९ लाख टन असण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशात उत्पादनात वाढ
उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात २ लाख टनांनी वाढ झाली आहे. या उलट महाराष्ट्रातील उत्पादन ४३ लाख टनांनी नेकमी झाले आहे. कर्नाटकमध्येही यंदा उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ लाख टन घट झाली आहे. तर गुजरातमध्ये यंदा अडीच लाख टनांनी साखर उत्पादनात घट झाली आहे.

No comments:
Post a Comment