पुणे - ग्रामीण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या "ऍग्रोवन ई ग्राम' ऍपने कोरोनाविरूद्धच्या लढण्यासाठी अनेक अभिनव सुविधा तयार केल्या आहेत. खास ग्रामीण भागाची गरज ओळखून यात वेगवेगळ्या सुविधा आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींसाठी, ग्रामीण व्यक्तीसाठी या सुविधांचा वापर करता येईल.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या ऍपमधील "कोरोना टॅब'मध्ये कोरोनाबद्दल बातम्या व खात्रीशीर माहिती मिळणार आहे. यात गावाचा डिजिटल आरोग्य सर्वे करता येणार असून, गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची माहिती डिजीटली गोळा करता येईल. गावात कोण आजारी आहे? कोण बाहेरून आलेलं आहे? आजारात सुधारणा किती आहे? अशा सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवता येणार आहे. त्यातील कोणाला कोरोनाची लागण होऊ शकते का? कोणाला होम क्वारंटाइन करायला पाहिजे का? याचीही माहिती कळू शकेल. ती प्रशासनाला पोचवता येईल. तसेच, त्यावर प्रशासन काय उपाययोजना करतय किंवा काय निर्णय घेतय, याचीही माहिती मिळेल. ही सर्व प्रक्रिया डिजीटली होईल. त्यासाठी प्रत्यक्ष व्यक्तीच्या घरी जायची गरज नाही. तसेच, लॉकडाउनदरम्यान वैद्यकीय सेवा, किराणा, गॅस अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडण्यासाठी ग्रामप्रशासनाला माहिती देण्यासाठी या ऍपमध्ये एक बटन आहे.
Coronavirus : जगभरात कोणत्या देशात किती कोरोना रुग्ण? वाचा सविस्तर बातमी
या ऍपचा वापर करून ग्रामीण महाराष्ट्रातील जनता कोरोनाविरूद्ध सक्षमपणे लढू शकतील. त्यातून त्यांना कोरोनाबद्दल खात्रीशीर माहिती मिळेलच, शिवाय डिजिटल आरोग्य सर्वेक्षण फॉर्मच्या माध्यमातून गावाच्या आरोग्याचे रेकॉर्ड डिजीटली ठेवता येईल.
- नीलेश शेजवळ, सीईओ ऍग्रोवन ऍग्रोटेक
ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी "ई ग्राम' ऍपचा वापर केला जातो. सध्या कोरोनाच्या साथीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट घरोघरी न जाता "ऍप'मधून माहिती भरता येते आहे. त्यासोबत ग्रामपंचायतीच्या सर्व उपाययोजना ऍपमधून नागरिकांपर्यंत पोचवणे सहज शक्य होते आहे.
- सौ. वसुंधरा शिवदास उबाळे, सरपंच, वाघोली (ता. हवेली)
No comments:
Post a Comment