युरोमोल चाटण विटेमुळे जनावरांची भूक वाढते, चारा चांगला पचतो, दूध उत्पादनात वाढ होते. जनावरे चांगला माज दाखवतात.निकृष्ट चाऱ्याची पोषणमूल्ये वाढवली जातात.चाऱ्याची पचनियता वाढते.जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
गाई, म्हशींचे उत्तम आरोग्य आणि जास्त दूध उत्पादनासाठी संतुलित पशुआहार देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने वाळलेला चारा दिला जातो. वाळलेल्या चाऱ्यामध्ये पोषकघटक आणि नायट्रोजनचे प्रमाण कमी असते. रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये कोठीपोटातील सूक्ष्मजीव नायट्रोजनपासून प्रथिने तयार करतात. त्यामुळे आहारात फक्त वाळलेला चारा असलेल्या जनावरांना पूरक आहार म्हणून गव्हाणीमध्ये युरोमोल चाटण वीट टांगून ठेवावी. असे केल्याने जनावरे आवश्यक तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्यांची पूर्तता करून घेतात.
युरोमोल चाटण वीट
युरोमोल चाटण विटेमध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थांसह खनिजमिश्रणे आणि जीवनसत्त्वांचे योग्य प्रमाण असते. हे कोठीपोटातील सूक्ष्मजिवांना नायट्रोजनचा पुरवठा करतात. सूक्ष्मजीव त्यापासून उत्तम प्रतीची प्रथिने तयार करतात. हे सूक्ष्मजीव मेल्यानंतर लहान आतड्यात त्यांचे विघटन होते. त्यापासून जनावरांना प्रथिने व अमिनो आम्ल मिळतात.
युरोमोल चाटण वीट बनविण्याची पद्धत
घटक | प्रमाण (टक्के) |
गव्हाचा भुसा | २० |
तांदूळ पॉलीश | २० |
गुळाचे पाणी किंवा मळी | ४० |
युरिया | १० |
मीठ | ५ |
खनिजमिश्रण | ५ |
कृती
- मोठ्या भांड्यात ४० किलो मळी घ्यावी. त्यामध्ये ५ किलो मीठ व १० किलो युरिया व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यावा.
- हे मिश्रण १२ तासांसाठी तसेच ठेवावे. त्यानंतर गव्हाचा भुसा, तांदूळ पॉलीश आणि खनिज मिश्रणे त्यामध्ये मिसळावीत. सर्व घटक व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यावे.
- तयार झालेले एकजीव ओले मिश्रण लाकडी चौकटीत टाकून वरून लाकडी फळीच्या साहाय्याने दाब द्यावा.
- तयार झालेली युरोमोल चाटण वीट कठीण होण्यासाठी २४ तास सुकण्यासाठी ठेवावी. त्यानंतर ही चाटण वीट गव्हाणीत टांगून ठेवावी.
चाटण विटेचे फायदे
- जनावरांची भूक वाढते, चारा चांगला पचतो, दूध उत्पादनात वाढ होते.
- जनावरे चांगला माज दाखवतात.
- निकृष्ट चाऱ्याची पोषणमूल्ये वाढवली जातात.चाऱ्याची पचनियता वाढते.
- जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
- जनावरे लवकर गाभण राहतात.त्यामुळे दोन वेतांमधील अंतर कमी होते.
- गाभण जनावरांना खाऊ घातल्यास मजबूत व निरोगी वासरे जन्माला येतात.
घ्यावयाची काळजी
- युरोमोल चाटण वीट सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या रवंथ करणाऱ्या जनावरांना द्यावी.
- गाई, म्हशी प्रतिदिन ५०० ग्रॅम, शेळी, मेंढी प्रतिदिन १०० ग्रॅम.
- युरोमोल चाटण वीट पावडर स्वरूपात किंवा पाण्यात भिजवून खाऊ घालू नये.
- साधे पोट असणाऱ्या जनावरांना खाऊ घालू नये.
- युरोमोल चाटण वीट जनावरांना पूरक आहार म्हणून देताना त्यांना सुका चारा, हिरवा चारा, खुराक व मुबलक प्रमाणात स्वच्छ आणि थंड पाणी द्यावे.
संपर्क - डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४
(पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

No comments:
Post a Comment