पुणे - व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शेतीक्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ॲग्रोवनच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हचा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे . या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रोज रात्री ७ वाजता वेगवेगळ्या विषयातील तज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्याअंतर्गत ता. २३ एप्रिल रोजी लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या दुग्धव्यवसायातील अडचणी या विषयावर गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ यांनी काल रात्री ७ वाजता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जवळपास एक लाख लोकांनां या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. या लाईव्हद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून रोज प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आपल्या मार्गदर्शनात म्हस्के यांनी लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या दुग्धव्यवसायातील परिणामांवर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना म्हस्के म्हणाले कि लॉकडाउनमुळे दुधाचे ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक संघाची अडचण निर्माण झाली आहे. दुध संघाकडे सरप्लस दुधाची पावडर निर्माण केली जात आहे. सरकारने यासाठी दुध संघाना मदत करायला पाहिजे. अस देखील त्यांनी सांगितलं. याबरोबर शहरात सोसायटीना थेट दुध पोहचवण्यासाठी कल्याणकारी संघातर्फे प्रयत्न सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारने दुध विक्री साठी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस परवानगी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
लॉकडाउन नंतर दुध उत्पादकांना चांगला भाव मिळेल. अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. त्याबरोबर शेतकऱ्यांच्या दुधभावासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीक्षेत्राशी संबंधीत तज्ञांचे फेसबूक लाईव्हद्वारे मार्गदर्शन देण्याचा अभिनव उपक्रम ॲग्रोवनने सुरू केला आहे. लॉकडाउन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. ह्या संवादात सहभागी होण्यासाठी दररोज रात्री ७ वाजता या लिंकवर https://www.facebook.com/AGROWON/ क्लिक करा. किंवा ॲग्रोवनच्या फेसबूक पेजला भेट द्या.
२४ एप्रिल फेसबुक लाइव्ह
अनिल घनवट
अध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना
विषय : लॉकडाउनमुळे निर्माण झालेली शेतकरी ते ग्राहक संधी आणि जबाबदारी
संध्याकाळी ७ वाजता
0 comments:
Post a Comment