शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि बीफीडोनॅक्टेरियम सारखे जिवाणू अन्न पचनाच्या कार्यास मदत करतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीने काही अन्नपदार्थांमध्ये जिवंत जिवाणू मिसळले जातात. अशा प्रकारचे उपकारक जिवाणू आणि त्यांचा वापर करून तयार झालेल्या औषधांना व अन्नपदार्थांना प्रोबायोटीक्स म्हणतात.
वैद्यकीय संशोधनाच्या मते, मानवी शरीरात साधारण १००० पेक्षा जास्त प्रजातींचे अब्जावधी सूक्ष्म जिवाणू असतात. हे जिवाणू मानवी शरीराचे असंख्य आजारांपासून संरक्षण करतात.प्रोबायोटीक्स जीवाणूंचे सर्वात जास्त प्रमाण दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आढळते. प्रोबायोटीक्स जिवाणूंचा उत्तम स्रोत म्हणून किण्वन केलेल्या दुग्ध पदार्थांना ओळखले जाते.
लॅक्टोबिसीलस व बीफीडोनॅक्टेरियम आणि काही बॅसिलस एकत्रित करून प्रोबायोटीक्स खाद्यपदार्थ बनविले जातात. यामध्ये दूध, दही, लस्सी, ताक, आइस्क्रीम, योगर्ट आणि तत्सम पदार्थांचा समावेश होतो. तसेच उपकारक जिवाणू प्रोबायोटीक्स औषधांमध्ये जसे गोळ्या, कॅप्सूल, पावडर, द्रव औषधे या स्वरूपातही उपलब्ध आहेत.
बाजारात प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ आणि पेये या स्वरूपात प्रोबायोटीक्स जास्त प्रमाणात आढळून येतात. विदेशी पेयांमध्ये सुमारे ६५० अब्ज प्रोबायोटीक्स जीवाणूंचे प्रमाण असते. प्रोबायोटीक्स जिवाणू विविध प्रकारच्या आंबवलेल्या अन्नपदार्थात उदा. लोणचे, योगर्ट, इडली आणि पेयांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतात.
‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थ
दही
- प्रोबायोटीक युक्त खाद्यपदार्थांमध्ये मुख्यतः दही व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये प्रोबायोटीक प्रकारातील बीफीडो बॅक्टेरीअम आणि लॅक्टोबॅसिलस हे जिवाणू आढळतात. घरगुती दह्यामध्ये प्रोबायोटीक जीवाणूंचे प्रमाण कमी अधिक आढळते. त्यामुळे घरगुती दह्याला प्रमाणित प्रोबायोटीक्सचा दर्जा दिला जात नाही.
- बाजारात प्रोबायोटीकचे लेबल लावलेली विविध खाद्यउत्पादने उपलब्ध आहेत. या खाद्यपदार्थांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने प्रमाणित केलेल्या संख्येइतके उपकारक जिवाणू असतात. त्यांचा आरोग्याला अधिक लाभ होतो.
डार्क चॉकलेट
- डार्क चॉकलेट हे देखील प्रोबायोटीकचा उत्तम स्रोत आहे. हे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.
- डार्क चॉकलेट मध्ये अधिक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील ‘फ्री रॅडीकल’ चे प्रमाण कमी करतात. त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.
प्रोबायोटीक लोणचे
- विविध प्रकारची लोणची तयार करतेवेळी त्यात किण्वन प्रक्रिया होते. त्यामुळे अशा लोणच्यात अधिक प्रमाणात प्रोबायोटीक तयार होतात.
- किण्वनयुक्त कोबी हे प्रोबायोटीक लोणच्याचे उत्तम उदाहरण आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रक्रियायुक्त लोणच्यांमध्ये नैसर्गिक एन्झायम नष्ट होतात. त्यामुळे घरगुती लोणचे अधिक पौष्टिक असते.
फळांचे रस
- डाळिंब, गाजर, स्ट्रॉबेरी, सफरचंद, अननस, आंबा इत्यादी सारख्या फळांचे रस तयार करतेवेळी लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडो बॅक्टेरीयमचा वापर केला जातो. याद्वारे प्रोबायोटीक युक्त आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त फळांचे रस बनवले जातात.
प्रोबायोटीक पदार्थांचे फायदे
- रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी.
- दुग्धशर्करेची कमतरता सुधारण्यासाठी.
- अतिसारापासून बचाव करण्यासाठी.
- पोट व आतड्यांचे आजार कमी करण्यासाठी
- प्रोबायोटीक्स मुळे पदार्थांची पौष्टिकता वाढते.
प्रोबायोटीक्स खाद्यपदार्थ व उपयुक्त सूक्ष्मजीव
प्रोबायोटीक्स अन्नपदार्थ | उपयुक्त सूक्ष्मजीव |
दूध | लॅक्टोबिसीलस एसिडोफीलस बीफीडोनॅक्टेरियम लॉगाम इ. |
दही | लॅक्टोबिसीलस एसिडोफीलस |
योगर्ट | लॅक्टोबिसीलस बाल्गारीकस व लॅक्टोबिसीलस थमोर्फीलास |
श्रीखंड | लॅक्टोबिसीलस केजी लॅक्टोबिसीलस, एसिडोफीलस, लॅक्टोबिसीलस बाल्गारीकस आणि स्टेप्टोकोकस थमोर्फीलास |
कुल्फी | लॅक्टोबिसीलस रमनसोय, केफिर लॅक्टोबिसीलस, नोकाएसीन लॅक्टोबिसीलस, एसिडोफीलस लॅक्टोबिसीलस बाल्गारीकस |
चीज | लॅक्टोबिसीलस एसिडोफीलस, लॅक्टोबिसीलस केसी, लॅक्टोबिसीलस पॅरा केसी. |
सोरखोट आणि इतर लोणची | ल्युकोनोस्टाक, लॅक्टोबिसीलस, प्लॅनेटरम, लॅक्टोबिसीलस ब्रिक्स, मेसेन्टराईड. |
संपर्क- शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८
(सौ. के. एस. के.(काकु) अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

No comments:
Post a Comment