Pages - Menu

Thursday, April 30, 2020

शेतीला औद्योगिक दर्जा देणे गरजेचे 

सध्याच्या कोरोना संकटात शेतीच माणसाला तारणहार बनली आहे. प्रत्येक देशाने, राज्याने, जिल्ह्याने व गावाने स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे हेच यातून दिसत आहे.शेती हा जगण्यासाठी महत्त्वाचा घटक सर्व जगाला या निमित्ताने अधिक समजला. त्यामुळे शेतीला औद्योगिक दर्जा देणे अतिशय महत्त्वाचे बनले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या उपायांची गरज 
-वीज, पाणी, अवजारे, खते, बियाणे व मालाला हमी भाव या घटकांमध्ये फार मोठे काम उभारून स्वयंपूर्ण होणे शक्य आहे. या संकटामुळे नवे व्यवसाय निर्माण होतील. नवे व्यवसाय समोर येतील. शहरातील लोकांचा लोंढा कमी होऊन तरुण युवक शेतीत नवे तंत्रज्ञान आणून खेडी स्वयंपूर्ण बनविण्याकडे कल वाढू शकेल. 
-येत्या काळात निर्जलीकरण केलेल्या, विषाणूमुक्त व पॅकिंग केलेला भाजीपाला घेण्याकडे कल वाढलेला दिसेल. असा माल सहा महिन्यांपर्यंत वापरता येईल. जेणेकरून ग्राहकांना भाजीपाला आणण्यासाठी सातत्याने बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या उपायांची गरज 

-निर्जलीकरण केलेल्या मालाला संधी उपलब्ध करता येईल. 
-शेतीला औद्योगिक दर्जा देणे महत्त्वाचे आहे. 
-शेतीसाठी आवश्यक वीज, पाणी, बियाणे, खते याबाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे 
- निर्जलीकरण केलेला भाजीपाला अन्नऔषध म्हणून पुढे येऊ शकतो. शरीराची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. 
-छोट्या शेतकऱ्यांना एक करून त्यांच्या शेतावरच प्रक्रिया उद्योग उभारणी व त्यांच्या ‘मार्केटिंग’साठी शासनाने मदत करावी. 
- शेती स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शेतकरी व युवकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन 
-शेतमालावर आधारीत प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी लागतील. 
-सेंद्रिय शेतीचा पुरस्कार 
- शासनाने सहकारी सोसायट्या व शेती विभागाने एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या मालाचे मार्केटिंग करावे. 
- अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढवून त्यातून स्वयंपूर्ण होणे खूप गरजेचे आहे. 
- दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः आपण आपले पर्याय निर्माण करणे. 
-पूर्वीप्रमाणेच आदर्श ग्रामवसाहत उभारणे. उदा. बारा बलुतेदारांची साखळी मजबूत करावी लागेल. -गावातील पैसा गावातच वापरणे. 
-ऑनलाइन मार्केटिंग’ प्रशिक्षण व तंत्रज्ञानाचा वापर 
-भाजीपाल्याची बास्केट तयार करून शहरांमधून घरपोच डिलिव्हरी करणे 

गीताराम कदम, प्रक्रिया उद्योजक व अध्यक्ष आनंदघना इंडस्ट्रीज, ता. शिरूर, जि. पुणे 



No comments:

Post a Comment