पुणे - पंतप्रधान सुक्ष्म सिंचन योजनेसाठी राज्य व केंद्र शासनाकडून पुणे जिल्ह्यातील चार हजार २५२ शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे १० कोटी १३ लाख २७ हजार रूपयांचे वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी दिली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वाढत्या पाणी टंचाईमुळे शेतकरी ठिबक सिंचनाचा अवलंब करत आहेत. मात्र, ठिंबक सिंचन करण्यासाठी येणारा खर्च अधिक असल्याने शासनाकडून प्रोत्साहन म्हणून ठिंबक सिंचनासाठी अनुदान देण्यात येत आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत केंद्र व राज्य शासनाने पुणे जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे दिलेला निधी मार्चअखेर पर्यंत खर्च करण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू झाली होती. त्यातच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निधी गतीने खर्च करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही अनुदान वाटपासाठी कार्यालये सुरू ठेवण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली होती.
Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?
कृषी विभागाकडे दाखल झालेल्या ऑनलाईन अर्जापैकी १८ हजार ९२५ अर्जांची छाननी करण्यात आली होती. त्यापैकी चार हजार ५२२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. तर १४ हजार ४०३ अर्ज अनुदान देण्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी दहा हजार ११० लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिली असून सहा हजार ३२० लाभार्थ्यांनी मोका तपासणी करून अनुदानासाठी कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केले होते. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत कृषी विभागाकडे उपलब्ध झालेल्या निधींपैकी चार हजार २५२ शेतकऱ्यांना १० कोटी लाख १३ लाख २७ हजार रूपयांच्या अनुदानाचे वाटप शेतकऱ्यांना केले.
तालुकानिहाय शेतकऱ्यांना दिलेले अनुदान, कंसात शेतकरी संख्या
आंबेगाव (५२७) एक कोटी ५० लाख ८७ हजार रूपये, बारामती (४९३) एक कोटी ३९ लाख २४ हजार, भोर (३७) ४ लाख ९९ हजार, दौड (५८९) एक कोटी २४ लाख ५७ हजार, हवेली (१९८) ४१ लाख १७ हजार, इंदापूर (७४५) एक कोटी ३८ लाख ६८ हजार, जुन्नर (३७३) एक कोटी एक लाख ६५ हजार, मुळशी (५) ८९ हजार रूपये, पुरंदर (२१५) ३५ लाख ८१ हजार, खेड (२१८) ३९ लाख ९८ हजार, शिरूर (८१६) दोन कोटी ३० लाख ४४ हजार, मावळ (१७) तीन लाख ५९ हजार, वेल्हा (१९) दोन लाख २३ हजार रूपये.
0 comments:
Post a Comment