Thursday, April 30, 2020

दुधाच्या योग्य दरासाठी धोरण बदला... 

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू झाले. त्याचा मोठा परिणाम दुग्ध व्यवसाय आणि पशुपालकांच्या दैनंदिन अर्थकारणावर झाला. अगोदरच दूध व्यवसाय तोट्यात असताना दूध संघांनी कोरोनाचे कारण देत दर कमी केले. याचा मोठा फटका पशुपालकांना बसला आहे. गेल्या दोन महिन्यात गाय व म्हशीच्या दरात लिटर मागे दूध संघानुसार चार रुपयांपर्यंत घट झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्याचा काळ हा कमी दुधाचा आहे. यामुळे दुधाची सर्वत्र टंचाई असते. त्यामुळे दुधाचे दरही वाढायला हवेत. वाढत्या उष्णतेच्या काळात दुग्धोत्पादन कायम राखण्याकरिता जनावरांचे काटेकोर संगोपन करावे लागते. योग्य खाद्य पुरवठा, आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष द्यावे लागते. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी जास्त पैसे खर्च होतात. या काळात दूध दर वाढण्याऐवजी कमीच झाल्याने पशुपालकांचे अर्थकारण तोट्यात गेले आहे. जानेवारीनंतर पशुखाद्याच्या एका पोत्यामागे किमान शंभर रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या खर्चासोबत अनपेक्षितपणे कोरोनामुळे राज्य आणि देशाची बाजारपेठ बंद असल्याचे सांगत दूध संघांनी खरेदी दर घटविले. त्यामुळे रोजचा खर्च भागवायचा कसा आणि दूध व्यवसाय कसा करायचा हेच समजेनासे झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गाईच्या दुधाच्या खरेदी दरामध्येही संघांनी घट केली. यामुळे गोठ्यात जास्त गाईंची संख्या असलेल्या पशुपालकांची अवस्था बिकट झाली आहे. आता सर्वजण कोरोनाचे कारण देत हात वर करत आहेत. पण अशीच परिस्थिती राहिल्यास पशुपालकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. हे लक्षात घेऊन दूध संघ, पशूपालक आणि बाजारपेठेची साखळी याच्या व्यवस्थापनात बदल करण्याची गरज आहे. पशूपालकाला किफायतशीर दर भेटण्यासाठी शासनाच्या पातळीवर धोरणात्मक बदलांची गरज आहे. 

या उपायांची गरज 
१) सरकारने पशुपालकांना थेट अनुदान द्यावे. दर्जेदार पशुखाद्याचा पुरवठा करावा. 
२) दूध संघ, संस्थांनी स्वतःच्या नफ्यातून दूध उत्पादकांना काही रक्कम प्रोत्साहनात्मक द्यावी. 
३) दूध संघाच्या विक्रीत झालेली घट भरून काढण्यासाठी शासनाने खास उपाय करून दूध विक्री वाढवण्यासाठी मदत करावी. 
४) पोषण आहाराअंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दूध वाटप करावे. स्थानिक दूध संस्थांना यामध्ये प्राधान्य द्यावे. 

शुभम वरेकर, उदगाव ता.शिरोळ जि.कोल्हापूर 



0 comments:

Post a Comment