लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून आजपर्यंत १ लाख २१ हजार ३४३ क्विंटल ३० किलो तुरीची खरेदी झाली. १३ हजार २६८ शेतकऱ्यांनी तूर विक्री केली. ५० हजार ३८ क्विंटलचे चुकारे अदा करण्यात आले.
जिल्ह्यात तुरीच्या खरेदीसाठी लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर, हलसी, चाकूर, रेनापूर, हलकी, भोपानी, लोणी, साताळा, शिरूर ताजबंद ही केंद्रे सुरू आहेत. या १२ केंद्रांवरून ३० हजार ८५ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली होती. चुकाऱ्यांचे २९ कोटी २ लाख २० हजार ४०० रुपये शेतकऱ्यांना दिले गेले, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.
हरभऱ्याची २२६९ शेतकऱ्यांकडून खरेदी
जिल्ह्यात तुरीच्या खरेदीसाठी निश्चित केंद्रांवरून हरभऱ्याचीही खरेदी सुरू आहे. उदगीर व हलसी केंद्र मात्र त्यास अपवाद आहे. ही दोन केंद्रे वगळता जिल्ह्यातील १० केंद्रांवरून २२६९ शेतकऱ्यांकडील ३० हजार १७४ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. हरभऱ्याच्या खरेदीसाठी १२ केंद्रांवरून आजवर ३४ हजार ३८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हरभऱ्याचे चुकारे अदा होणे बाकी आहे.

0 comments:
Post a Comment