Pages - Menu

Tuesday, May 12, 2020

गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी कपाशी टाळा

कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे  मोठे नुकसान होते. या किडीचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत पिकांचे अवशेष नष्ट करण्यासोबत पूर्व हंगामी लागवड करू नये. नवीन लागवड ही जून महिन्यांमध्ये ८०-१०० मिमी  पाऊस झाल्यानंतरच करावी.

ग त वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाल्यामुळे पेरण्या उशीरापर्यंत झाल्या. पावसाला एकदा सुरवात झाल्यानंतर सलग पाऊस पडला.  त्यानंतरही मध्ये पाऊस येत गेल्याने कापूस काढण्याचा हंगाम लांबला. अंदाजे ७० टक्के कापूस जानेवारीच्या मध्यापर्यंत संपुष्टात आला. मात्र,  ३० टक्के शेतकऱ्यांनी मध्ये मध्ये येत गेलेल्या पावसामुळे कापूस तसाच ठेवला.  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत नव्हता. त्यानंतर हळू हळू वाढीस लागला.
मार्चच्या मध्यापासून टाळेबंदी सुरु झाल्यामुळे भारतातील अपेक्षित उत्पादनाच्या (३६० लाख गाठी रुई) तुलनेत अंदाजे २८० लाख गाठीचा कापूस बाजारात आला. उर्वरित अंदाजे ८० लाख गाठी रुईचा कापूस अद्याप शेतकऱ्यांकडे बाजारपेठा बंद असल्यामुळे विक्री अभावी पडला आहे. सूतगिरण्या व कारखाने बंद असल्यामुळे कापसाची जिनिंग पूर्ण करता आली नाही. लांबलेला हंगाम, शेतकऱ्यांकडे असलेला कापूस व सूतगिरणीत जिनिंग न झालेला कापूस इ. घटकांमुळे येत्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्व घटकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमीत कमी पातळीवर ठेवण्यासाठी पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करावे.  

शेतातील मागच्या हंगामातील पिकाचे अवशेष (खराब/ अर्धवट उमललेली/ किडलेली बोंडे व पराट्या) जमा करून नष्ट करावेत. शेताच्या धुऱ्यावर किंवा बांधावर कापसाच्या धसकटाचा संचय करु नये. हंगाम संपल्यावर शेवटच्या पिढीतील गुलाबी बोंड अळ्या या प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे, परतीची पराटीची धसकटे अथवा मातीत सुप्तावस्थेत जातात. गुलाबी बोंडअळी चे जीवनचक्र खंडित होऊन किडींचा पुढील प्रसार थांबवण्यासाठी असे अवशेष वेळेत नष्ट करणे आवश्यक आहे.
मार्केट यार्ड, जिनिंग मिल परिसरात कामगंध सापळे २० मीटर अंतरावर कमीत कमी १० कामगंध सापळे लावावेत. सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नष्ट करावेत. सोबतच सरकीतून निघालेल्या अळ्यांचा नायनाट करावा. सापळ्यातील ल्युर निर्धारित वेळी बदलावेत. सुप्तावस्थेतील अळ्यांपासून निघालेले पतंग कामगंध सापळ्यामध्ये जमा होवून मारले जातील. पुढील उत्पत्ती रोखण्यास मदत होईल. अन्यथा हे पतंग जवळपासच्या शेतात उडत जाऊन तेथील कपाशी पिकावर प्रादुर्भाव करतील.  
 पूर्व हंगामी कापसाची पेरणी करणे टाळावे. लवकर पेरलेल्या कपाशीवर लवकर पात्या, फुले येतात. पावसाबरोबर सुप्तवास्थेतून बाहेर पडणारे गुलाबी बोंडअळीचे पतंग अशा पूर्व हंगामी पिकाच्या पात्या व फुलांवरच आपली अंडी देतात. इतरत्र कापसाचे पीक नसल्यामुळे लवकर पेरलेले कपाशीचे पीक गुलाबी बोंडअळीला बळी पडू शकते. वेळेत नियंत्रण न केल्यास किडीच्या पुढच्या पिढ्या तयार होण्यास मदत होते व त्यांचा प्रसार पुढे हंगामी कपाशीवर स्थलांतरित होतो.
लागवडीपुर्वी जमिनीची खोल नांगरणी करून मशागत करावी. मातीत लपलेले कोष व सुप्तावस्थेतील अळ्या वर येऊन उन्हाळ्यातील प्रखर सूर्यप्रकाशामुळे (जास्त तापमानामुळे) मरून जातात. पक्ष्यांनी वेचून खाल्ल्यामुळे नष्ट होतात.
 मागच्या वर्षी ज्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त होता त्या ठिकाणी पिकाची फेरपालट करावी.  कपाशी हेच गुलाबी बोंड अळीचे एकमेव खाद्य आहे, त्यामुळे पिकाची फेरपालट केल्यास खाद्य पिकाअभावी गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते.
 रसशोषक किडीसाठी प्रतिरोधक व कमी कालावधीत येणा-या आणि लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. सुरवातीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील रसशोषक  किड नियंत्रणासाठी अनावश्यक  किटकनाशकाची  फवारणी टाळता येते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव  हा कपाशी हंगामाच्या मध्यापासून सुरु होऊन शेवटपर्यंत वाढत जातो. त्यामुळे लवकर परिपक्व होणा-या वाणांमुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गुलाबी बोंडअळीच्या जास्त प्रादुर्भावापासून सुटका होण्यासाठी मदत होते.
पेरणी जून महिन्यात साधारणतः ८०-१०० मिमी  पाऊस झाल्यानंतर करावी. पिकाची चांगली उगवण होणे  व सुरुवातीच्या रोपावस्थेत तग धरून राहण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट  टाळता येते. पेरणी जून महिन्यात केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी रारोखण्यास मदत होते.
 कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी अशी माहिती पत्रके  बियाणे विक्रीवेळीच शेतकऱ्यांना द्यावीत. तसेच पूर्व हंगामी लागवड न करण्याच्या सूचनाही बियाणे विक्री केंद्रावरून द्याव्यात. परिणामी गुलाबी बोंड अळी रोखणे शक्य होईल.

- डॉ.  विजय वाघमारे,   ० ७१०३-२७५५३६,

(प्रभारी संचालक, केंन्द्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर )

News Item ID: 
820-news_story-1589289532-729
Mobile Device Headline: 
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी कपाशी टाळा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agricultural Agriculture News Marathi article regarding pink ball worm in cotton
Author Type: 
External Author
डॉ. विजय वाघमारे
Search Functional Tags: 
कापूस, बोंड अळी, bollworm
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article regarding pink ball worm in cotton
Meta Description: 
कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. या किडीचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत पिकांचे अवशेष नष्ट करण्यासोबत पूर्व हंगामी लागवड करू नये. नवीन लागवड ही जून महिन्यांमध्ये ८०-१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.

No comments:

Post a Comment