Thursday, May 7, 2020

शेतमाल विपणनाच्या पारंपारीक पद्धती बदलण्याची हिच योग्य वेळ

कोरोना नियंत्रणासाठी जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला गडबडलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःला सावरले. अनेक भाजीपाला व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी ही थेट विक्रीची संधी साधली. शेतकरी कंपन्यांनी आपल्या पातळीवर अनेक प्रयत्न करून मार्ग काढले. मात्र, त्याला कृषी विभाग आणि शासनाची जोड मिळाल्यास अधिक गती मिळेल. मिळालेली गती टिकून राहील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हे उपाय महत्त्वाचे 
- पहिल्यांदाच या आपत्तीच्या स्थितीत पिकविणारा ते खाणारा अशा प्रकारचा विक्री व्यवस्थेचा पर्याय या काळात उपलब्ध झाला. ही साखळी अशीच कायम ठेवण्यासाठी शेतकरी कंपन्या दुवा ठरु शकतात. शेतीमालाची आकर्षक पॅकींग, ब्रॅण्डींग आणि अॅपच्या माध्यमातून ग्राहक मिळविणे हे पर्याय विचारात घेण्याची गरज आहे. यासाठी मोबाईल किंवा अॅपच्या माध्यमातून शेतमाल विक्री कशी करावी, यासाठी कंपन्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावे. 

लॉकडाऊनच्या काळात ''या'' दोघा युवा बंधूंनी केला यशस्वी प्रयोग 

- घावूक बाजारात काहीवेळा ५० पैसे किलो असा टोमॅटोचा दर मिळत असताना थेट विक्रीतून शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळवणे शक्‍य असल्याचा आम्हाला अनुभव यावेळी आला. लॉकडाऊनच्या काळामध्ये पिकविणाऱ्यापासून थेट ग्राहकांपर्यंतची साखळी तयार झाली आहे. ती कायम ठेवण्यासाठी पॅकींग, ब्रॅण्डींग या सोबत अनेक परवाने यांची आवश्यकता भासेल. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा. शेतकरी कंपन्यांसाठी मार्गदर्शनासह प्रोत्साहनात्मक शिथिलता व पतपुरवठा दिल्यास यात अनेक गट धाडस करतील. 

- स्वच्छता, प्रतवारी, पॅकींगसाठी आवश्यक यंत्रासाठी पतपुरवठा आणि योग्य योजना आणल्या पाहिजेत. 

शेतकऱ्यांनी विकला पावणे आठ कोटींचा भाजीपाला

- शासनाने काही कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जाहिर केला होता. अशा उपक्रमांऐवजी शासनाने शेतकऱ्यांनाच बांधावर वृक्ष लागवडीसाठी रोपांचा पुरवठा व प्रोत्साहन दिल्यास पर्यावरण रक्षणाचा उद्देश बऱ्यापैकी साधता येईल. उदा. मोह, चारोळी, फणस इ. त्यातून हंगामामध्ये शेतकऱ्यांना चार पैसेही मिळतील. 

- गावपातळीवर आवश्यक निविष्ठांच्या पुरवठ्यासाठी शेतकरी कंपन्यांची मदत घेणे अपेक्षीत आहे. 

- गावात बिजोत्पादन कार्यक्रम राबविल्यास कृषी सेवा केंद्राकडे जाणारा ओढा रोखता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- गेल्या अडीच वर्षांपासून आमची कंपनी केसापासून अॅमीनो अॅसीड तयार करते. पिकांसाठी संजिवक म्हणून त्याचा वापर होतो. बाजाराच्या तुलनेमध्ये आम्ही स्वस्तामध्ये पुरवठा करतो. असे पर्याय गावस्तरावर रोजगार उपलब्ध करुन देतात. 

- कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर असली तरी गाव पातळीवर छोट्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी झालेली नाही. उदा. रुई, सरकीपासून तेल, सुतापासून कापड अशी साखळी तयार झाली तर गाव खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल. 

- रोजगार हमी योजनेत शेतीकामाचा समावेश. 

सुनील ढोले, अध्यक्ष,  ॲग्रीकेअर फार्मर प्रोड्युसर कंपनी, 
नारा, ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा 
मो. ९९२२४०१७८८ 



0 comments:

Post a Comment