राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन महिने खंडित झालेला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचा मोंढा शुक्रवारी सुरू झाला; मात्र, कोरोनाचा मोठा फटका कांद्याला बसला आहे. आवक कमी राहिली आणि भावही घसरले.
शेतकऱ्यांचा नवीन कांदा निघाला. बहुतांश शेतकऱ्यांनी चाळी भरण्यास प्राधान्य दिले. गरजू शेतकऱ्यांनी कांद्याचा मोंढा सुरू करण्याची मागणी केली. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीचे आवाहन केले. नोंदणीकृत शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाने बाजार समितीला कळविली. प्राधान्य क्रमानुसार बाजार समितीने शेतकऱ्यांना कांदा आणण्यास सांगितले.
शुक्रवारी मोंढ्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या एक हजार ४१५ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात कांदाचाळी भरताना निवडीचा खराब कांदा जास्त प्रमाणात होता. कोरोनामुळे घटलेली मागणी, अशाश्वत बाजारपेठ, अत्यल्प आवक, खराब माल अशा कारणांमुळे कांद्याचे भाव घसरले. कोरोना संकटापूर्वी राहुरी बाजार समितीत कांद्याचा शेवटचा लिलाव १७ मार्च रोजी झाला होता. त्या वेळी तब्बल ४१ हजार ९३२ कांदा गोण्यांची आवक झाली.
शुक्रवारचा प्रती क्विंटल दर (कंसात दोन महिन्यांपूर्वीचा दर)
क्रमांक एक | ५७५ ते ७०० (१२०० ते १६००) |
क्रमांक दोन | ३५० ते ५७०, (६५० ते ११९५) |
क्रमांक तीन | १०० ते ३४५, (१०० ते ६४५ |
गोल्टी | २०० ते ५००, (९०० ते १४००) |

No comments:
Post a Comment