सातारा ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॅाकडाउनचा इतर पिकांप्रमाणे आले (अद्रक) पिकासही फटका बसू लागला आहे. राज्यासह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद असल्यामुळे आले पिकाच्या व्यवहारावर मर्यादा असून त्यास मागणी कमी झाली आहे. गत महिन्यात स्थानिक व्यापारी २० हजार २२ हजार रुपये प्रतिगाडी या दराने आले खरेदी करीत होते. मात्र मागणी अभावी हे दर आता निम्म्याने कमी झाले असून सध्या स्थानिक व्यापारी १२ हजार ते १४ हजार रुपये प्रतिगाडी या दराने आले खरेदी करीत आहेत.
राज्यात सातारा व औंरगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक आले पीक घेतले जाते. मागील सहा ते सात वर्षांत आल्यास समाधानकारक दर मिळत असल्याने या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी सातारा जिल्ह्यात सरासरी २५०० हेक्टरवर आले लागवड झाल्याचा अंदाज असून यावर्षी आले पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी बियाणे खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र मार्च महिन्यापासून देशभरात ‘कोरोना’चे संकट आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॅाकडाउन सुरू केल्याने मुंबई, पुणे याप्रमुख बाजारपेठा बंद झाल्या आहेत. परिणामी सर्व पिकांना फटका बसला आहे. यामध्ये आले या नगदी पिकांची भर पडली आहे. मागील दी़ड ते दोन महिन्यांत प्रति गाडीस (५०० किलो) २० ते २२ हजार रुपये दर मिळाला होता. बियाण्यास विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या दरम्यान दर मिळाला होता.
पुणे, मुंबई या प्रमुख बाजारपेठातील अस्थिर वातावरणामुळे आले दरात घसरण झाली आहे. सध्या आले पिकास १२ ते १४ हजार रुपये दर दिले जात आहे. लॅाकडाउनमुळे आले पिकाचे दर तुलनेत निम्म्यावर आल्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. लॅाकडाउनमुळे मागील दोन महिन्यांत आले काढणी न झाल्यामुळे माल तुंबून राहिल्याने सध्या आले विक्रीस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहे. दरातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचा आले काढणीकडे कल वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी काठावर आले धुण्याची कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. या दरामुळे नवीन लागवडीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment