Wednesday, May 13, 2020

घडनिर्मिती, डोळा फुटणे अन् स्कॉर्चिंग समस्येवरील उपाययोजना

गेल्या दोन दिवसापूर्वी द्राक्ष विभागामध्ये पाऊस, गारपीट व वादळी वारे होत आहे. या परिस्थितीत बागेतील तापमान बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसेल. ज्या भागात जास्त प्रमाणात पाऊस झाला, अशा ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहिल. परिणामी बागेत आर्द्रता वाढेल. या स्थितीत द्राक्षबागेत पुढील अडचणी उद्भवू शकतात.

घड निर्मितीची समस्या
घडनिर्मितीची अवस्था असलेल्या द्राक्ष बागेत पाऊस झाला असल्यास यावेळी वेलीचा जोम व फुटीच्या पेऱ्यातील अंतरसुद्धा जास्त प्रमाणात वाढताना दिसून येईल. पेरा वाढत असल्यास वेलीमध्ये जिबरेलीनचे प्रमाण जास्त वाढते. परिणामी काडीवरील डोळ्यात होत असलेली सूक्ष्म घडनिर्मिती ही बाळीमध्ये रुपांतरीत होते. त्यामुळे सूक्ष्मघड निर्मितीच्या कालावधीत वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता नत्राचा वापर बंद करून पाणी सुद्धा नियंत्रणात ठेवण्याची शिफारस असते. या बागेत जोम नियंत्रणात ठेवण्याकरिता खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.

  • सल्फेट ऑफ पोटॅशची जमिनीतून उपलब्धता करणे. भारी जमिनीत दीड किलो, व हलक्या जमिनीत एक किलो एसओपी प्रती एकर प्रती दिवस प्रमाणे तीन ते चार वेळा ड्रिपद्वारे द्यावे. शक्य झाल्यास २.५ ते ३ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे दोन फवारण्या कराव्यात.
  •  शेंडा पिंचिंग त्वरीत करावा.
  • संजीवकांचा वापर यावेळी महत्त्वाचा असेल. पहिली फवारणी ६ बीए १० पीपीएम. या फवारणीनंतर चार दिवसांनी युरासील २५ पीपीएम प्रमाणात फवारणी करावी. काडीवर निघालेल्या बगलफुटी त्वरीत काढाव्यात.

काडीवर मुख्य डोळा फुटण्याची समस्या 
या वर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे बऱ्याच बागेमध्ये शिफारशीपेक्षा जास्त पाणी देण्यात आल्याचे दिसून येते. बागेत पाणी मोकळे दिले असेल, तर मुळांच्या नियमित कक्षेच्या बाहेर असलेली व उपयोगात न आलेली मुळेही या वेळा कार्यरत होतात. जमिनीतून उपलब्ध केलेले खत- पाणी किंवा अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात उचलली जातात. परिणामी वेलीचा जोम जास्त प्रमाणात वाढतो. जेव्हा सूक्ष्म घडनिर्मितीच्या कालावधीत वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता आपण बऱ्यापैकी वाढ विरोधकांचा वापर करतो. पालाशची फवारणीसुद्धा यावेळी बऱ्यापैकी केली जाते. बऱ्याच वेळा सबकेन झाल्यानंतर शेंडा मारतेवेळी हा जोम आपल्याला अडचणीत आणतो. वातावरणात झालेला बदल आणि वेलीचा वाढत असलेला जोम याचे संतुलन बिघडल्यास काडीवरील सबकेनच्या ठिकाणी नुकताच ठिसूळ होत असलेला सूक्ष्मघडनिर्मितीचा हा डोळा नाजूक असल्यामुळे फुटायला सुरुवात होते. हे टाळण्याकरीता पुढील उपाययोजना महत्वाच्या असतील.

  • सहा ते सात दिवस शेंडा वाढ तशीच होऊ द्यावी.
  • बगलफुटीसुद्धा काढू नये.
  • वाढविरोधक व पालाशची फवारणी काही कालावधी करिता बंद करावी.
  • वेलीची शेंड्याकडील वाढ करून घेण्याकरिता युरिया दीड ते दोन ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे एकदा फवारणी करावी. जमिनीतून पाणीसुद्धा रोजच्या तुलनेत १० ते १५ टक्क्याने एक दिवसाकरिता वाढवावे.

कोवळ्या फुटींवर स्कॉर्चिंग येण्याची समस्या
सोलापूर व सांगलीच्या काही भागात खरड छाटणी नुकतीच झाली. यावेळी या भागात ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान व ३५ टक्के पेक्षा कमी आर्द्रता आढळून येईल. डोळे फुटण्याच्या या कालावधीत तापमान कमी असणे आवश्यक होते. काही उपाययोजना केल्यामुळे बागेत फुटी निघाल्या तरी त्या मागेपुढे होताना दिसून येतात. ओलांड्यावरील काडीची जाडी कमी अधिक असल्यामुळे व तसेच छाटणी करिता निवडलेल्या डोळ्यांची जागा खाली वर असल्यामुळे (डोळ्यांची जाडी कमी अधिक असणे.) डोळे मागेपुढे फुटतात. फुटी लवकर फुटाव्या या करिता बरेच बागायतदार बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करतात. या सोबत युरियाची फवारणी केली जाते. उडद्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किटकनाशकांची फवारणीही तितक्या प्रमाणात होते. फुटी निघत असताना एक ते दोन पाने अवस्थेत हरितद्रव्यांची निर्मिती मुळीच झालेली नसते. अशा परिस्थितीत जर उन्हाच्या वेळी फवारणी झाली, रसायनांची मात्रा जास्त झाली असल्यास पानावर स्कॉर्चिंग दिसून येईल. बऱ्याच बागेत पानांच्या कडा जळालेल्या दिसून येतील. या करिता पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.

  • फवारणीची मात्रा कमीत कमी असावी.
  • फवारणी शक्यतो सायंकाळी घ्यावी.
  • पानांवर पाण्याची फवारणी सायंकाळी घ्यावी.
  • बाजारात उपलब्ध असलेल्या व डोळे फुटण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या पर्यायांचा वापर शक्यतोवर चार पाने अवस्थेपर्यंत टाळावा.

संपर्क- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

News Item ID: 
820-news_story-1589378633-196
Mobile Device Headline: 
घडनिर्मिती, डोळा फुटणे अन् स्कॉर्चिंग समस्येवरील उपाययोजना
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi grapes advisory
Author Type: 
External Author
डॉ. आर. जी. सोमकुंवर
Search Functional Tags: 
पूर, Floods, द्राक्ष, ऊस, गारपीट, पाऊस, ओला, पाणी, Water, खत, Fertiliser, युरिया, Urea, सोलापूर, पुणे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
grapes, advisory
Meta Description: 
grapes advisory ​गेल्या दोन दिवसापूर्वी द्राक्ष विभागामध्ये पाऊस, गारपीट व वादळी वारे होत आहे. या परिस्थितीत बागेतील तापमान बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसेल. ज्या भागात जास्त प्रमाणात पाऊस झाला, अशा ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहिल. परिणामी बागेत आर्द्रता वाढेल. या स्थितीत द्राक्षबागेत पुढील अडचणी उद्भवू शकतात.

0 comments:

Post a Comment