जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा सुवर्णबाजार लॉकडाऊनमुळे सुमारे ४२ दिवस बंद राहील्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. अक्षय तृतीया, गुढीपाडव्याला इतिहासात प्रथमच हा बाजार बंद राहीला. सराफ, कारागीर अशा सर्वच मंडळींना याचा फटका बसला. आता सुमारे ४२ दिवसानंतर हा बाजार सुरू झाला असून, जळगावची उलाढाल वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगावचा सुवर्णबाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. परराज्यातील खरेदीदार सोने खरेदीसाठी जळगावात आवर्जून येतात. जिल्ह्यात सोने, चांदी विक्रीची सुमारे ९०० दुकाने आहेत. चार हजार कर्मचारी त्यात काम करतात. आठ हजार कारागीर दागिने घडविण्याचे काम करतात. कोट्यवधींची उलाढाल अक्षय्य तृतीयेला या बाजारात होत असते.
कापूस, केळी उत्पादक जिल्ह्यात अधिक आहे. शेतकरी प्रत्येक हंगामात नफा आल्यास सोने खरेदीवर भर देतात. तसेच अडचणीच्या काळात शेतकरी आपल्याकडील सोने या बाजारात मोड म्हणून विक्री करतात. या बाजाराचे शेतीच्या अर्थकारणातही महत्त्व पूर्वीपासून आहे. परंतु लॉकडाऊनमुळे या बाजारातील सुमारे १०० कोटींची उलाढाल थांबली.
ग्रामीण भागात अक्षय्य तृतीयेला महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीया महत्त्वाची असून, शेतकरी, ग्रामस्थ सोन्याची खरेदी या दिवशी करतात. परंतु लॉकडाऊनमुळे सुवर्ण बाजार बंद राहील्याने सुमारे ३० कोटींची उलाढाल झालीच नाही. ७० वर्षात प्रथमच एवढी मंदी, अडचण सहन करावी लागल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली.

No comments:
Post a Comment