Thursday, May 14, 2020

खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३०० रूपये दर

जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची आवक कमी झाली. सध्या शिवार खरेदी वेगात सुरू आहे. दरांत काहीशी सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटल कमाल १३०० रुपयांपर्यंतचे दर शिवार खरेदीमध्ये मक्‍याला मिळत आहेत. 

मक्‍याची लागवड खानदेशात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर झाली होती. उत्पादन यंदा चांगले झाले. आवक सुरवातीला कमी होती. सुरवातीला दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. परंतु, या महिन्याच्या सुरवातीला दर कमी होत गेले. ते ११०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. परंतु, या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव, जामनेर, रावेर बाजार समितीमध्ये मक्‍याची आवक कमी झाली.

धुळ्यातील शिरपूर व दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील बाजारातील आवक रोडावली आहे. सध्या खानदेशात बाजार समित्यांमध्ये रोज मिळून पाच हजार क्विंटल मक्‍याची आवक होत आहे. 

लवकरच स्टार्च व इतर कारखाने सुरू होतील. यामुळे मक्‍याची उचल वाढली आहे. दरात सुधारणा झाली आहे. दर्जेदार किंवा कमी आर्द्रतेच्या मक्‍याला १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. शासकीय खरेदीदेखील सुरू होणार आहे. मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. शासकीय खरेदी केंद्रात मक्‍याला १७६० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळेल. यामुळे मका दरात सुधारणा झाल्याची माहिती मिळाली. 
 
News Item ID: 
820-news_story-1589441513-928
Mobile Device Headline: 
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३०० रूपये दर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची आवक कमी झाली. सध्या शिवार खरेदी वेगात सुरू आहे. दरांत काहीशी सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटल कमाल १३०० रुपयांपर्यंतचे दर शिवार खरेदीमध्ये मक्‍याला मिळत आहेत. 

मक्‍याची लागवड खानदेशात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर झाली होती. उत्पादन यंदा चांगले झाले. आवक सुरवातीला कमी होती. सुरवातीला दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. परंतु, या महिन्याच्या सुरवातीला दर कमी होत गेले. ते ११०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. परंतु, या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव, जामनेर, रावेर बाजार समितीमध्ये मक्‍याची आवक कमी झाली.

धुळ्यातील शिरपूर व दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील बाजारातील आवक रोडावली आहे. सध्या खानदेशात बाजार समित्यांमध्ये रोज मिळून पाच हजार क्विंटल मक्‍याची आवक होत आहे. 

लवकरच स्टार्च व इतर कारखाने सुरू होतील. यामुळे मक्‍याची उचल वाढली आहे. दरात सुधारणा झाली आहे. दर्जेदार किंवा कमी आर्द्रतेच्या मक्‍याला १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. शासकीय खरेदीदेखील सुरू होणार आहे. मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. शासकीय खरेदी केंद्रात मक्‍याला १७६० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळेल. यामुळे मका दरात सुधारणा झाल्याची माहिती मिळाली. 
 
English Headline: 
Agriculture news in marathi Buying Shivar in Khandesh Maize at the rate of Rs 1300 per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, रावेर, बाजार समिती, agriculture Market Committee
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Buying, Shivar, Khandesh, Maize, rate, 1300, per, quintal
Meta Description: 
Buying Shivar in Khandesh Maize at the rate of Rs 1300 per quintal जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची आवक कमी झाली. सध्या शिवार खरेदी वेगात सुरू आहे. दरांत काहीशी सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटल कमाल १३०० रुपयांपर्यंतचे दर शिवार खरेदीमध्ये मक्‍याला मिळत आहेत. 

0 comments:

Post a Comment