आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार सात महिन्यांतील उच्चांकावर
पुणे - ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज आणि खाद्यतेलातील तेजीमुळे सोयाबीन तेलाला मागणी वाढल्याने सोयाबीन तेजीतये. पामतेलाचे दर विक्रमी पातळीवर असल्याने सोयाबीन तेलाला पसंती मिळतेय. परिणामी सोयाबीनला मागणी वाढली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दराने १५३८ सेंटचा टप्पा गाठला.
सोयाबीन तेलातील तेजीचा लाभ देशातील सोयाबीनलाही होत असून दर टिकून आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर विक्रमी पातळीवर आहेत. मंगळवारी सोयाबीन वायद्याने सात महिन्यांतील उच्चांक गाठला होता. तर बुधवारी १५३८ सेंट प्रतिबुशेल्सने व्यवहार झाले. ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतीक सोयाबीन पुरवठा आणि साठा कमी राहण्याचा अंदाज असल्याने अमेरिकेच्या सोयाबीनला मागणी वाढली आहे. परिणामी अमेरिकेच्या वायदेबाजारात सुधारणा पाहायला मिळाली, अशी माहिती जाणकारांनी दिली. मंगळवारी शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर मार्चचे सोयाबीन वायद्यांनी १५३९ सेंटवर पोहचून १५२८ सेंटवर बंद झाले. मंगळवारी ११ जूननंतर पहिल्यांदा सोयाबीन वायद्यांनी १५०० सेंटचा टप्पा ओलांडला होता. तर बुधवारी मार्चचे वायदे १५३८ सेंटवर पोचले होते. सीबाॅटवर सोयाबीनसह सोयापेंडचेही दर वाढले आहेत.
जागतीक पातळीवर सोयाबीन उत्पादनात ब्राझील जगात अग्रेसर आहे. मात्र येथे यंदा अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे येथील सोयाबीन उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण ब्राझीलमध्ये दुष्काळी स्थिती गंभीर आहे, असे येथील संस्थांनी सांगितले. ब्राझीलसह अर्जेंटीनातही सोयाबीन पिकाला दुष्काळी स्थितीचा फटका बसत आहे. परिणामी येणाऱ्या काळात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्हिडीओ पाहा -
ब्राझीलमधील स्टोनएक्स या संस्थेने येथील सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. संस्थेने यापूर्वी १ हजार ३४० लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र येथील दुष्काळी स्थिती वाढल्याने उत्पादन १ हजार २६० लाख टनांवरच स्थिरावेल, असे म्हटले आहे. मागील वर्षीपेक्षा हे उत्पादन कमी असेल. तर ब्राझीलमधील अॅगरुरल या संस्थेने येथे १ हजार २८५ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर अॅगसोर्स या संस्थेने १ हजार २५० लाख टनांवर उत्पादन स्थिरावेल, असं म्हटलं आहे. मागील वर्षी ब्राझीलमध्ये १ हजार ३८० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दराचा भडका उडाल्याने सोयाबीन तेलाची मागणी वाढली आहे. परिणामी सोयाबीन तेलाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे वाढलेल्या दरात सोयाबीन प्रक्रिया फायदेशीर ठरत आहे. चीनने अमेरिकेच्या बाजारातून सोयाबीनची मोठी खरेदी केली आहे. याचाही लाभ सोयाबीन बाजाराला होत आहे. सोयाबीन तेलाच्या वाढलेल्या दरामुळे सोयाबीनलाही मागणी वाढत आहे
ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटलं आणि अमेरिकेच्या वायदे बाजारात सोयाबीन तेजीत आले इथपर्यंत ठिकये. पण याचा आमच्या सोयाबीन दरावर काय परिणाम होईल? असा प्रश्न तुमच्या मनात आलाचं असेल. तर तेही सांगते. सोयाबीनमध्ये तेजी येण्याची दोन कारणे सांगिली जातात. एक म्हणजे ब्राझीलमध्ये उत्पादनात घटीचा अंदाज आणि दुसरे म्हणजे सोयाबीन तेलातील तेजी. तर सोयाबीन तेलातील तेजीचा लाभ देशातील सोयाबीन बाजाराला होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल तेजीत असल्याने देशात गाळपासाठी सोयाबीनला मागणी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन दर टिकून आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.
News Item ID:
820-news_story-1643875439-awsecm-192
Mobile Device Headline:
आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार सात महिन्यांतील उच्चांकावर
Appearance Status Tags:
Section News
Site Section Tags:
बाजारभाव बातम्या
Mobile Body:

English Headline:
International soybean market hits high within seven months
No comments:
Post a Comment