Pages - Menu

Friday, November 9, 2018

आंबा मोहोराच्या संरक्षणासाठी राहा सज्ज

सद्यःस्थितीत कोकण विभागामध्ये आंबा पिकामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून तुरळक प्रमाणात मोहोर येऊ लागतो. त्याचे प्रमाण डिसेंबर-जानेवारी महिन्यात वाढते.

  • सर्वसाधारणपणे पावसाळ्यानंतर आंबा बागांची साफसफाई करतात. या वेळी दाट वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची विरळणी करावी. त्यामुळे झाडांमध्ये पुरेसा प्रकाश पडतो आणि हवा खेळती राहते. त्याचा फायदा कीड व रोग आटोक्यात राहण्यासाठी होतो.
  • विरळणीनंतर आंब्यावर किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावरच फवारणी करावी.
  • या टप्प्यामध्ये आंबा पालवीवर खालील किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन करावे.

१. तुडतुडे

  • पिले व प्रौढ आंब्याच्या मोहोरावरील, कोवळ्या पालवीमधून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. परिणामी, मोहोर व लहान फळांची गळ होते.
  • तसेच त्यांच्या शरीरावाटे स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट द्रवावर काळ्या रंगाची कॅप्नोडिअम बुरशी वाढते. अनेक वेळा झाड काळे पडते. याला शेतकरी खार पडणे असे म्हणतात.

उपाययोजना ः

  • तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील, अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी.
  • वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिलावस्थेत असतानाच कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • पहिली फवारणी - डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मिलि प्रति लिटर पाणी - मोहोर येण्यापूर्वी करावी. ही फवारणी आंबा बागेमधील हापूस तसेच रायवळ जातीच्या सर्व झाडांवर तसेच खोडांवर करावी. खोडांवरील सुप्तावस्थेत असलेल्या तुडतुड्यांचे नियंत्रण होईल.
  • दुसरी फवारणी - बोंगे फुटताना आणि उर्वरित तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
  • तुडतुड्यांमध्ये कीटकनाशकास प्रतिकारशक्ती निर्माण होणे टाळण्यासाठी कीटकनाशकाचा आलटून पालटून वापर करावा.

आंबा मोहोर संरक्षणाचे सुधारित वेळापत्रक (प्रति १० लिटर पाणी)

पहिली फवारणी ः पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ९ मि.लि. - या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यापासून संरक्षण होते.

दुसरी फवारणी ः (बोंगे फुटताना) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि. या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने (५ टक्के) हेक्झाकोनॅझोल
५ मि.लि. किंवा पाण्यात विरघळणारे (८० टक्के गंधक) २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी (१२ टक्के) कार्बेन्डाझिम अधिक (६३ टक्के) मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) ः शिफारशीप्रमाणे - तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी (५ टक्के) हेक्झाकोनॅझोल ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे (८० टक्के गंधक) २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी १२ टक्के कार्बेन्डाझिम + ६३ टक्के मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) शिफारशीप्रमाणे -

पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) किंवा
लॅम्बडा सायहेलोथ्रीन (५ टक्के) १० मि.लि.
६ मि.लि.

सहावी फवारणी (पाचव्या फवारणी नंतर गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.

टीप ः मोहोराच्या अवस्थेमध्ये फवारणी करताना मधमाशांना हानीकारक कीटकनाशकांचा वापर टाळावा.

२.फुलकिडे

  • ही कीड १ मि.मी. आकाराची असून, रंग पिवळसर असतो.
  • मादी कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते.
  • पिले व पूर्ण अवस्थेतील फुलकिडे पानाची साल खरवडून पानातील रस शोषतात.
  • पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात.
  • प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगळ होते. फक्त शेंडेच शिल्लक राहतात.
  • कोवळ्या फळांची साल खरवडल्यामुळे फळांची साल काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते.
  • फुलकिडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.५ मि.लि.
  • फळांवरील फुलकिडींसाठी, स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.२५ मिलि किंवा थायामेथॉक्झाम (२५ टक्के) ०.२ ग्रॅम.
    (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, तथापि अॅग्रेस्को शिफारशी आहेत.)

डॉ. आनंद नरंगलकर (विभाग प्रमुख), ९४०५३६०५१९
डॉ. बी. डी. शिंदे (सहायक प्राध्यापक), ८००७८२३०६०
डॉ. अंबरीष सणस (संशोधन सहयोगी), ९९६०३३२३७०

(कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

News Item ID: 
18-news_story-1541766653
Mobile Device Headline: 
आंबा मोहोराच्या संरक्षणासाठी राहा सज्ज
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, pest management in mango
Author Type: 
External Author
डॉ. आनंद नरंगलकर, डॉ. बी. डी. शिंदे, डॉ. अंबरीष सणस
Search Functional Tags: 
कोकण, Konkan, विभाग, Sections, कीटकनाशक, हापूस, रायवळ, ओला, बाळ, baby, infant, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 

No comments:

Post a Comment