कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या गूळ सौद्यास क्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाला. कोल्हापुरच्या महापौर शौभो बोंद्रे, सभापती कृष्णात पाटील उपसभापती अमित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सौदे झाले. पाडव्या दिवशी तीस हजार गूळ रव्यांची आवक झाली. शहरातील विविध भागातून ही आवक झाली. सकाळी आठ वाजता महुर्ताने सौदे झाले.
पहिल्या दर्जाच्या गुळास ४२०० ते ४७९०, दुसऱ्या दर्जास ३६०० ते ४१००, तिसऱ्या दर्जाच्या गुळास ३१०० ते ३६००, तर चौथ्या दर्जाच्या गुळास ३००० ते ३१०० रूपये दर मिळाला. स्पेशल गुळास ४८०० ते ५१०० रुपये दर होता. एक किलोच्या बॉक्सला २९०० ते ४३०० रुपये दर होता. अमर पाटील यांच्या अाडत दुकानात हे सौदे झाले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उस क्षेत्र वाढले असले तरी मध्यंतरीच्या प्रतिकूल हवामानामुळे उसाची उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. यामुळे गुळाचे उत्पादनही कमी होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुळास चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज यावेळी विविध वक्त्यांनी वर्तविला.
यावेळी परशुराम खुडे, विलास साठे, उदयसिंह पाटील, दशरथ माने, सर्जेराव पाटील, शारदा पाटील, बाबासाहेब लाड, उत्तम धुमाळ, शेखर येडगे, संजय जाधव, सौ. संगीता पाटील, शाशिकांत आडनाइक, नंदकुमार वळंजू, भगवान काटे, सचिव मोहन सालपे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment