Pages - Menu

Wednesday, November 7, 2018

कोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक वाढली

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध फळांची चांगली आवक झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये बाजार समितीत इतर दिवसांपेक्षा फळांची पन्नास टक्के अधिक आवक झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फळांना मोठे महत्त्व असते. यामुळे व्यापाऱ्यांबरोबर घरगुती स्वरूपातही फळांची खरेदी होते. कवटाच्या एका बॉक्‍सला २०० ते ६०० रुपये दर होता. दिवाळीच्या दोन दिवस अगोदरपासून फळांच्या आवकेस सुरवात होते.

सप्ताहाच्या पहिले दोन दिवस सर्वच फळांची मोठी आवक झाली. इतर शहरातले किरकोळ विक्री करणारे व्यापारी दोन दिवस अगोदरच फळे खरेदी करतात. यामुळे दिवाळीच्या आदल्या दिवसापासून राज्यभरातून फळांची आवक होते. नियमित दरापेक्षा फळांच्या दरात वीस टक्क्‍यांपर्यंत वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

संत्र्यांची १७५ क्रेट आवक झाली. संत्र्यास क्रेटला २०० ते ५०० रुपये दर होता. मोसंबीची शंभर चुमड्यांची आवक होती. मोसंबीच्या चुुमड्यास २०० ते ९०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची ८५ ते ९० क्रेट आवक होती. डाळिंबास किलोस १० ते ५० रुपये दर होता. सीताफळाच्या पन्नास ढिगांची आवक होती. पन्नास सीताफळाच्या एका ढिगास १०० ते ८०० रुपये दर होता.

चिकूची २३५ पोती आवक होती. चिकूस शेकडा ५० ते ४०० रुपये दर होता. सफरचंदाची दररोज दोनशे चारशे बॉक्‍स आवक झाली. सफरचंदाच्या एका बॉक्‍सला १००० ते २४०० रुपये दर होता.

लक्ष्मीपूजनामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, फळांचे स्टॉल गजबजून गेले होते. तात्पुरता निवारा करून फळांची विक्री झाली. पाच फळांच्या सेटला ३० ते ५० रुपयांपर्यंतचा दर विविध मंडईमध्ये होता. आणखी दोन दिवस तरी फळांचे दर चांगले राहतील, असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला. विशेष करून कवठाला अधिक मागणी होती.

News Item ID: 
18-news_story-1541599427
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक वाढली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, In Kolhapur, the inflow of fruits increased for Lakshmi Pooja
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पूर, बाजार समिती, agriculture Market Committee, दिवाळी, व्यापार, मोसंबी, Sweet lime, डाळ, डाळिंब, सीताफळ, Custard Apple, सफरचंद, apple
Twitter Publish: 

No comments:

Post a Comment