Pages - Menu

Wednesday, November 7, 2018

फळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी द्या

सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. झाडाची हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. शक्य तेथे ठिबक सिंचनाचा वापर करावा.

  • बाष्पीभवनाने जमिनीतील सुमारे ७० टक्के ओलावा नष्ट होतो. यासाठी शेतातील काडी कचरा, धसकटे, गवत, तूरकाड्या, भुसा इत्यादीचा ७ ते ८ सेंटिमीटर जाडीचा थर आच्छादनासाठी वापरावा. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो.
  • झाडाच्या आळ्यात ४ ते ५ मडके बसवावेत, मडक्यांच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून झाडांच्या मुळ्यांना पाणी द्यावे. सर्वसाधारण एका मडक्यात तीन ते चार लिटर पाणी ओतावे. मडक्यातील पाणी झिरपत राहून झांडाचा तंतुमय मुळास उपलब्ध होते. त्यामुळे झाडे जिवंत राहतात.
  • पोटशिअम नायट्रेट १ ते १.५ टक्का किंवा केवोलीन ८ टक्के द्रावणाची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने फळझाडांच्या पानांवर केल्यास बाष्पीभवनास अडथळा निर्माण होऊन बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.
  • मातीचा थर झाडाच्या खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे कार्य करतो.
  • दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये फुले लागल्यास ती काढून टाकावीत. कोणताही बहर धरू नये.
  • झाडाची हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो.
  • झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट लावल्यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात. बुरशीजन्य रोगास प्रतिबंध होतो.
  • इंजेक्टर हे फार सोपे उपकरण आहे. हा एक अणुकुचीदार पाइप असून पुढच्या अणुकुचीदार तोडास दोन छिद्रे असतात. इंजेक्टर मध्ये ३० सेंटिमीटर लांब व १२.५ मी.मी. व्यासाचा जीआय पाइप फूट स्प्रेअरला जोडला जातो आणि त्यातून एका वेळी पाच लिटर पाणी दिले जाते. याप्रमाणे जमिनीत सुमारे २० सें.मी. खोलीवर प्रत्येक झाडाला चार वेळा पाणी देऊन एकंदर वीस लिटर पाण्यात १५ मार्च ते २० मे काळात १८ वर्ष वयाची मोसंबीची झाडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वाचविण्यात आली होती. ८) प्लॅस्टिकच्या आच्छादनाने मातीतील ओलावा वाफेचे रूपाने बाहेर पडू शकत नाही. ओलावा जतन करून ठेवण्यास मदत होते. कमी पाण्यात फळबागा जगविता येतात.
  • कलमाभोवती कुशाने २० ते ३० सें.मी. खोल खळगे करावेत. या खळग्यात चार किंवा पाच दिवसांच्या अंतराने हाताने पाणी भरावे आणि खळगे तणीसाने झाकावेत.
  • खडडा पद्धतीचा वापर करताना झाडाच्या बुंध्यापासून अंदाजे १ फूट अंतरावर १ फूट लांब, रुंद आणि १ ते १.५ फूट खोल खड्डा करून पाणी भरावे. खड्ड्याचा वरील भाग आच्छादनाने झाकून टाकावा. पाण्याचा संथगतीने निचरा होण्यासाठी थोडे शेण टाकावे. त्यामुळे झाडाच्या कार्यक्षम मुळांना पाण्याची उपलब्धता होते.
  • झाडाचा आकार अगदी लहान असल्यास किंवा नवीन लागवड केली असल्यास रोपावर मांडव करून शेडनेट किंवा गवताने सावली करावी. त्यामुळे झाडाचे तापमान वाढणार नाही. पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.
  • जुन्या पाइपचे तुकडे करून तीस सें.मी. खोल जमिनीत रोवावेत. पाइपवर १५ सें.मी. अंतरावर लहान छिद्रे पाडावीत. यामुळे जमिनीच्या खालच्या थरास मुळाभोवती पाणी पोचते.
  • सलाइनच्या बाटल्या धुऊन त्यामध्ये पाणी भरावे. झाडाच्या आळ्यामध्ये काठीच्या आधाराने बाटली टांगावी. त्यांची नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीच्या एकदम जवळ ठेवावी. त्यातून ठिबक सिंचनाप्रमाणे थोडे थोडे पाणी पडत राहते. यामध्ये पाण्याचा वेग कमी जास्त करता येतो. पाण्याचा कार्यक्षम उपयोग होतो.

फळबागेस विश्रांती ः

  • पाणीटंचाई लक्षात घेता बागेस पूर्ण विश्रांतीची गरज आहे. शास्त्रीय अभ्यासक्रमातून असे दिसून आले आहे, की चार ते पाच वर्ष वयाच्या झाडावर अडीचशे ते तीनशे फळे जोपासण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे, हवेतील आर्द्रता आणि तापमानानुसार ६५ ते ७५ लिटर प्रतिदिन पाण्याची आवश्यकता असते.
  • सध्या कोणताही बहर न घेता झाडावरील सर्व फळे काढून टाकावीत. आच्छादनाचा वापर केल्यास दहा ते पंधरा लिटर पाण्यात फळझाडे जगू शकतात.
  • शक्य तेथे ठिबक सिंचनाचा वापर करावा.

आच्छादनाचा वापर ः

  • उसाचे पाचट, गव्हाचे काड, झाडाची पाने, लाकडी भुसा, गिरिपुष्पाची पाने, लहान फांद्या किंवा शेतामधील काडी कचरा इ. चा उपयोग आच्छादनासाठी करावा.
  • जेथे शक्य आहे तेथे ८० ते १०० मायक्रॉन जाडीच्या पॉलिफिल्मचे आच्छादन करावे.
  • सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यासाठी ४ ते ६ इंच जाडीचा सेंद्रिय आच्छादनाचा थर उपयुक्त आहे.

(मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना)

News Item ID: 
18-news_story-1541587136
Mobile Device Headline: 
फळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी द्या
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, sweet orange irrigation & management
Author Type: 
External Author
डॉ. एम. बी. पाटील
Search Functional Tags: 
पाणी, Water, ठिबक सिंचन, सिंचन, ओला, मोसंबी, Sweet lime, कृषी विद्यापीठ, Agriculture University, फळबाग, Horticulture, तण, weed, पाणीटंचाई, पूर
Twitter Publish: 

No comments:

Post a Comment