Friday, May 1, 2020

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

शेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम स्वतःची आणि आपल्या कामगारांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन करावयाचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक मजूरांमध्ये दोन मीटरचे अंतर राखावे. प्रत्येकाने चेहऱ्याभोवती घट्ट मास्क लावावा. दर काही वेळानंतर साबणाने हात स्वच्छ धुवून व्यक्तीशः स्वच्छता राखावी. शेतीची उपकरणे व यंत्रे चांगल्या प्रकारे स्वच्छ करावीत.

  • अंबिया बहारात झालेल्या फळ धारणेसाठी सिंचन सुरू ठेवावे. येणारा उन्हाळा व वाढत्या तापमानाला अनुसरून पाण्याच्या पाळीमधील अंतर ६ ते ७ दिवसांचे करावे.
  • संत्रा व मोसंबीच्या ८ वर्षाच्या झाडाला ६५ लीटर दिवसाआड प्रती झाड आणि १० वर्ष आणि त्यावरील झाडाला २०० लीटर दिवसआड प्रती झाड पाणी द्यावे.
  • लिंबाच्या १ वर्षाच्या झाडाला ११ लीटर, २ वर्षाच्या झाडाला १६ लीटर, ८ वर्ष आणि त्यावरील झाडाला १०० लीटर पाणी दिवसआड प्रती झाड या प्रमाणात द्यावे.
  • उन्हाळ्यातील फळगळती थांबवण्यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती शेतातील गवत, तणस ,गव्हांडा इ. सेंद्रिय घटकांचा थर देऊन आच्छादन करावे. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. जमिनित ओलावा टिकून राहतो. अंबिया बहाराची फळगळ कमी होण्यास मदत होते.
  • १ वर्षाच्या संत्रा झाडाला १०८ ग्रॅम युरिया किंवा २५० ग्रॅम अमोनियम सल्फेट व १५७ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट सोबत प्रत्येकी २५ ग्रॅम झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि मँगेनीज सल्फेट द्यावे. दोन वर्षाच्या झाडास दुप्पट, तीन वर्षाच्या तिप्पट आणि चार वर्षाच्या झाडाला चौपट खतांची मात्रा २०-२५ किलो शेणखतात मिसळून द्यावी. ही रासायनिक आणि सेंन्द्रीय खते झाडाच्या भोवती व माती ओलसर असताना द्यावीत.
  • थ्रीप्स, पाने पोखरणारी अळी आणि मिलीबग या कीडींचा प्रार्दुभाव आढळून येत आहे. त्यांच्या नियंत्रणाकरीता, फवारणी प्रती लीटर पाण्यात इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा डायमिथोएट २ मिली. मिसळून आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
  • मिली बग नियंत्रणासाठी, बागेतील व परिसरातील मुंग्यांची वारूळे नष्ट करावी. झाडांच्या बुंध्यावर व पानांवर फवारणी प्रती लीटर पाण्यात क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिली मिसळून फवारणी करावी.
  • या महिन्यात संत्र्यावर कोळ्याचाही प्रार्दुभाव दिसून येतो. या कीडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रती लीटर पाण्यात डायकोफॉल (१.८ ईसी) २ मिली मिसळून १५ दिवसानंतर पुन्हा दुसरी फवारणी करावी.
  •  मिली बग नियंत्रणासाठी, मुंग्यांची वारूळे नष्ट करावी. झाडांच्या बुंध्यावर व पानांवर क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  •  मृग बहार बागेमध्ये वाळलेल्या फांद्याच्या २ सेंमी खालील ओला भाग काढून टाकावा. अशा झाडांवर कार्बेनडाझीम १ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  •  अंबिया बहाराची फळगळ थांबण्यासाठी २-४ डी हे १.५ ग्रॅम किंवा जिबरेलिक आम्ल १.५ ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रती १०० लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. जास्त फळगळ असल्यास फवारणी १५ दिवसांनी पुन्हा करावी. नियमित देखरेखीखाली सिंचन सुरू ठेवावे.
  •  नर्सरी धारकांनी पन्हेरी उगवणीसाठी १ भाग काळीमाती, १ भाग रेती, वाळू आणि १ भाग कुजलेले शेणखत यांचे मिश्रण सिमेंट कॉंक्रीटच्या प्लॅटफार्मवर १.५ फूट जाडीचा थर करून पसरवावे. यावर पाणी टाकून ते पूर्णपणे ओले करावे. यावर १०० मायक्रॉंन जाडीचा पारदर्शक पॉलीथिन पेपरने झाकावे. यातून वाफ बाहेर जाऊ नये, यासाठी पेपर चारही बाजूने पक्की झाकावे.

संपर्क-  ०७१२- २५००८१३
(केंन्द्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.)

News Item ID: 
820-news_story-1588250142-288
Mobile Device Headline: 
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Citrus fruit advisory
Author Type: 
External Author
केंन्द्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.
Search Functional Tags: 
शेती, farming, आरोग्य, Health, कोरोना, Corona, सिंचन, मोसंबी, Sweet lime, ओला, सिंगल सुपर फॉस्फेट, Single Super Phosphate, खत, Fertiliser, नागपूर, Nagpur
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Citrus, fruit, advisory
Meta Description: 
Citrus fruit advisory शेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम स्वतःची आणि आपल्या कामगारांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन करावयाचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक मजूरांमध्ये दोन मीटरचे अंतर राखावे. प्रत्येकाने चेहऱ्याभोवती घट्ट मास्क लावावा. दर काही वेळानंतर साबणाने हात स्वच्छ धुवून व्यक्तीशः स्वच्छता राखावी. शेतीची उपकरणे व यंत्रे चांगल्या प्रकारे स्वच्छ करावीत.

0 comments:

Post a Comment