अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी महापालिका हद्दीत सार्वजनिक बाजार बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी ‘फार्म टू होम’ या संकल्पनेअंतर्गत २७६ शेतकऱ्यांना फळ, भाजीपाला विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. भाजी व फळबाजारात एकाचवेळी गर्दी होत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती होती. त्यामुळे भाजी व फळबाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे सामान्यांची अडचण झाली. उपलब्ध कोणत्याही ठिकाणाहून भाजीपाला खरेदीची वेळ त्यांच्यावर आली. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘फार्म टू होम’ संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळ, भाजी विक्रीची संधी उपलब्ध करुन दिली.
फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याव्दारे त्यांचा माल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. त्याकरिता महापालिकेकडून शेतकऱ्यांना अधिकृत परवानाही दिला जाणार आहे. बाजार व परवाना विभागाकडे त्यासाठी अर्ज करावा लागेल. या माध्यामातून शेतकऱ्यांना महापालिका हद्दीत फळे, भाजीपाल्याची विक्री करता येईल.
२७६ शेतकऱ्यांना परवाने
महापालिका प्रशासनाने शेतकरी ते ग्राहक संकल्पनेअंतर्गत २७६ शेतकऱ्यांना विक्री परवाने दिले आहेत. थेट विक्री करणाऱ्या या परवानाधारक शेतकऱ्यांना सातबारा व ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहिल.

0 comments:
Post a Comment