Wednesday, May 13, 2020

तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक तत्वावर सुरू 

सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तासगाव बाजार समितीतील बंद असलेले बेदाण्याचे सौदे सोमवारी (ता. ११) प्रायोगिक तत्वावर सुरू केले. या सौद्यासाठी १७६० बॉक्‍सची आवक झाली असून ९७० बॉक्‍सची विक्री झाली. नव्या पद्धतीने सौदे सुरू केल्याने केवळ एका अडत व्यापाऱ्याचे सौदे काढण्यात आले होते. बेदाण्याला सरासरी प्रति किलोस ११० ते १६० रुपये असा दर मिळाला. गुरुवारी (ता. १४) पुन्हा सौदे काढण्यात येतील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले तासगाव बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सुरक्षित अंतराचे पालन करत सुरुवात झाली आहे. बाजार आवारात ८० बेदाणा अडत दुकाने आहेत. येथील बेदाणा सेल हॉलमध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार या तीन दिवसी बेदाणा सौदे होत आहेत. सौद्यात अडत व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आणि खरेदीदार अशा केवळ तिघांच्या समोर सर्व खबरदारी घेऊन सौदे काढण्यात आले. सध्या सौद्यामध्ये आलेल्या अडचणींचा विचार करुन पुढील सौद्यात बदल केले जाणार आहे. एक अडत व्यापाऱ्याला दहा मिनिटांऐवजी दोन तास वेळ मिळणार आहे. 

हिरवा बेदाणा ११० ते १६०
पिवळा बेदाणा १०० ते १४० 
काळा बेदाणा ४० ते ६५
News Item ID: 
820-news_story-1589379966-224
Mobile Device Headline: 
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक तत्वावर सुरू 
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तासगाव बाजार समितीतील बंद असलेले बेदाण्याचे सौदे सोमवारी (ता. ११) प्रायोगिक तत्वावर सुरू केले. या सौद्यासाठी १७६० बॉक्‍सची आवक झाली असून ९७० बॉक्‍सची विक्री झाली. नव्या पद्धतीने सौदे सुरू केल्याने केवळ एका अडत व्यापाऱ्याचे सौदे काढण्यात आले होते. बेदाण्याला सरासरी प्रति किलोस ११० ते १६० रुपये असा दर मिळाला. गुरुवारी (ता. १४) पुन्हा सौदे काढण्यात येतील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले तासगाव बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सुरक्षित अंतराचे पालन करत सुरुवात झाली आहे. बाजार आवारात ८० बेदाणा अडत दुकाने आहेत. येथील बेदाणा सेल हॉलमध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार या तीन दिवसी बेदाणा सौदे होत आहेत. सौद्यात अडत व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आणि खरेदीदार अशा केवळ तिघांच्या समोर सर्व खबरदारी घेऊन सौदे काढण्यात आले. सध्या सौद्यामध्ये आलेल्या अडचणींचा विचार करुन पुढील सौद्यात बदल केले जाणार आहे. एक अडत व्यापाऱ्याला दहा मिनिटांऐवजी दोन तास वेळ मिळणार आहे. 

हिरवा बेदाणा ११० ते १६०
पिवळा बेदाणा १०० ते १४० 
काळा बेदाणा ४० ते ६५
English Headline: 
Agriculture news in marathi Sangli raisin deals started on an experimental basis
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, तासगाव, बाजार समिती, agriculture Market Committee, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sangli raisin deals started on an experimental basis
Meta Description: 
Sangli raisin deals started on an experimental basis सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तासगाव बाजार समितीतील बंद असलेले बेदाण्याचे सौदे सोमवारी (ता. ११) प्रायोगिक तत्वावर सुरू केले. या सौद्यासाठी १७६० बॉक्‍सची आवक झाली असून ९७० बॉक्‍सची विक्री झाली. नव्या पद्धतीने सौदे सुरू केल्याने केवळ एका अडत व्यापाऱ्याचे सौदे काढण्यात आले होते. बेदाण्याला सरासरी प्रति किलोस ११० ते १६० रुपये असा दर मिळाला. गुरुवारी (ता. १४) पुन्हा सौदे काढण्यात येतील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

0 comments:

Post a Comment