नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन केले असतानाही या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या नॅशनल फर्टीलाझर्स लि. (एनएफएल) च्या खत विक्रीत एप्रिल महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये ३.६२ लाख टन खत विक्री झाली असून गेल्या वर्षी याच काळात २.१२ लाख टन विक्री झाली होती.
देशात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे खत कंपन्यांना खते वाहतूक आणि लॉजिस्टीकची मोठी समस्या जाणवत आहे. या समस्या असतानाही संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कंपनीने खते वेळेवर पोचविली आहेत. ‘एनएफएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मिश्रा म्हणाले की, ‘‘एप्रिल-२०२० मध्ये आतापर्यंतचा खते विक्रीचा विक्रम झाला आहे. कंपनीच्या मार्केटींग टिमने लॉकडाऊनच्या काळात अथक परिश्रम घेऊन खते वितरण केले आहे.’’
‘एनएफएल’ पंजाबमधील नांगल आणि भटींडा, हरियानातील पानीपत आणि मध्य प्रदेशीतल वियजपूर येथील दोन अशा पाच प्लांटमध्ये युरिया उत्पादन करते. कंपनीची ३५.६८ लाख टन युरिया उत्पादनाची क्षमता आहे.
एप्रिल महिन्यात वर्षनिहाय झालेली खत विक्री (लाख टनांत)
१.५६
२०१७
१.६७
२०१८
२.१२
२०१९
३.६२
२०२०

No comments:
Post a Comment