ज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते, त्याला हायपोथिकेशन (Hypothecation) म्हणतात. जो पर्यंत कर्ज आहे, तो पर्यंत या सर्व बाबी बँकेकडे तारण असतात.
दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयातून रमेश व बँकेचे कृषी अधिकारी बाहेर पडले. त्यासा समोरच आलेल्या सुरेशने पाहिले. तो म्हणाला , अरे, रमेश, इकडे कोठे? काय काम काढलेस? रमेश म्हणाला, जमिनीच्या गहाणखताची नोंदणी करावयाची होती. त्यासाठी आलो आहे. हे माझ्या बरोबर बँकेचे कृषी अधिकारी. त्या दोघांसोबतच सुरेशही बँकेत आला. नव्याने बदली होऊन आल्याने बॅंकेचे कृषी अधिकारी सुरेशला ओळखत नव्हते. सुरेशने त्यांची स्वतः होऊन ओळख करून घेतली. रमेशला बँकेने दुग्ध व्यवसायासाठी १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यासाठी जमीन तारण म्हणजेच जमिनीचे गहाणखत नुकतेच केले आहे.
चर्चा करताना कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले, की, सुरेशला आपल्या बँकेने दुग्ध व्यवसायासाठी कर्ज दिले आहे. त्यात १० गाईंची खरेदी, गोठा बांधकाम आणि कुट्टी मशीन सारखी यंत्र सामुग्री यांचा समावेश आहे. ज्या प्रकल्पासाठी कर्ज दिले जाते, त्या बाबी बँकेकडे तारण राहतात. त्यातील गाई व इतर यंत्रे ही चल म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येण्याजोगी आहेत. पण गोठा हा स्थिर किंवा स्थावर मालमत्तेमध्ये येतो. त्यामुळे ज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते, त्याला हायपोथिकेशन (Hypothecation) म्हणतात. जो पर्यंत कर्ज आहे, तो पर्यंत या सर्व बाबी बँकेकडे तारण असतात. गोठा ज्या क्षेत्रात बांधला आहे, ते क्षेत्र व ८ अ मध्ये जी जमीन आहे. ती जमीनही तारण ठेवली जाते. म्हणजे तिचे गहाण खत करावे लागते. त्याप्रमाणे आज रमेशच्या जमिनीचे गहाणखत केले. त्याची दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदही केली आहे.
यावर सुरेशला एक प्रश्न पडला. तो म्हणाला की, मी आपल्या बँकेकडून घरासाठी कर्ज घेतले आहे. कर्ज घेताना जे खरेदी खत होते ते बँकेने स्वत:कडे ठेऊन घेतले आहे. पण मी/ बँकेने काही दुय्यम निबंधक यांचेकडे जाऊन त्याची नोंद केलेली नाही. त्यावर कृषाी अधिकाऱ्यांनी अधिक सविस्तर माहिती दिली.
ज्या जमिनीचे मूळ कागदपत्र /खरेदी खत नाही किवा जी जमीन वडीलोपार्जित आलेली असते, त्या जमिनीचे गहाणखत करतात. त्याची नोंद दुय्यम निबंधक यांच्याकडे करावी लागते. याला नोंदणीकृत गहाणखत म्हणतात (Registered Mortgage)
ज्या जमिनीचे मूळ दस्तऐवज / खरेदीपत्र आहे, ते खरेदीखत बँक स्वत: कडे ठेऊन घेते. याला इक्विटेबल मॉर्गेज (Equitable Mortgage) म्हणतात. अशा प्रकारचे गहाण खत करण्याचे अधिकार बँकेला दिलेले आहेत. कर्जाची परतफेड झाल्यावर मूळ दस्त ऐवज / खरेदीखत बँक परत देते.
- दोन्ही प्रकारच्या गहाणखताला शासनाची फी (Stamp duty) द्यावी लागते. याशिवाय फक्त नोंदणीकृत गहाणखताला वेगळी नोंदणी फी द्यावी लागते.
- दोन्ही प्रकारच्या गहाण खताची नोंद ही संबंधित जमिनीच्या उताऱ्यावर करावी लागते.
- कृषी कायद्यानुसार जाहीर करणे ः डिक्लेरशन अॅज पर अॅग्रिकल्चर क्रेडिट अॅक्ट या द्वारेही बँकेच्या कर्जाची नोंद जमिनीच्या उताऱ्यावर करता येते.
- सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतले असल्यास सोसायटी मात्र इ-कराराद्वारे जमिनीवर कर्जाची नोंद करतात.
तारण
पीक कर्ज :
अ ) कर्ज रक्कम रु. १,६०,०००/-
ज्या कारणासाठी कर्ज दिले आहे, तेच फक्त तारण म्हणजे पीक तारण (Hypothecation of Crop)
ब) कर्ज रक्कम रु. १,६०,०००/- पेक्षा जास्त असेल तेव्हा
ज्या कारणासाठी कर्ज दिले आहे ते तारण म्हणजे पीक तारण (Hypothecation of Crop) आणि जमिनीचे गहाण खत (Mortgage of Land )
मध्यम /दीर्घ मुदत कर्ज
अ ) कर्ज रक्कम रु. १,६०,०००/-
ज्या कारणासाठी कर्ज दिले आहे, तेच फक्त तारण (Hypothecation of assets created out of Bank loan)
ब) कर्ज रक्कम रु. १,६०,०००/- पेक्षा जास्त असेल तेव्हा,
ज्या कारणासाठी कर्ज दिले आहे, ते तारण (Hypothecation of assets created out of Bank loan) आणि जमिनीचे गहाण खत (Mortgage of Land )
- अनिल महादार, ८८०६००२०२२
(निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया)

No comments:
Post a Comment