एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वांत अधिक वाढ हरभऱ्यात (६.६ टक्के) होती. सर्वांत अधिक घट साखरेत (१.४ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, कापूस व हळदीत घट होईल. इतरांचे भाव वाढतील.
या सप्ताहातसुद्धा मॉन्सूनने फार निराशा केली नाही. १ जूनपासून जुलैपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ७ टक्क्यांनी कमी होता. १० जुलैपर्यंत तो ९ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पंजाब, कोकण, विदर्भ, आंध्र प्रदेश, तेलंगणा व तमिळनाडू येथे झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आसाम, उत्तर प्रदेश, ओडिशा व गुजरात येथे झाला आहे. पुढील सप्ताहात माॅन्सूनची प्रगती चालू राहील असा अंदाज आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल, अशी अपेक्षा आहे. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असासुद्धा अंदाज केला जात आहे. अमेरिका – चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे भारताची चीनला निर्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन पेंडीवरील आयात शुल्क चीनने कमी केले आहे. कापसाची निर्यातसुद्धा भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.
४ जुलै रोजी केंद्र शासनाने २०१८-१९ खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले. २०१७-१८ च्या तुलनेने यांत मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर जरी बाजारातील किमती कमी झाल्या तरी हमीभाव मिळतील, अशी यंत्रणा निर्माण केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र बाजारातील भाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत म्हणून आयातीवरील नियंत्रणे वाढविणे व निर्यातीला चालना देणे यासाठी शासन प्रयत्नशील असेल. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.
मका
रब्बी मक्याच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. १,२५४ ते रु. १,१८३). या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. १,२३२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१४१ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२९८ वर आहेत. उत्पादन वाढलेले आहे. खरिपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत यापुढे घट संभवते. जर साठा असेल, तर तो विकून टाकणे योग्य होईल. खरीप मक्याचा (सांगली) नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३० आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता).
साखर
साखरेच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. २,८९३ ते रु. ३,११०). या सप्ताहात त्या १.४ टक्क्याने घसरून रु. ३,२७५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१५० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या (२०१८) फ्युचर्स किमती रु. ३,३७५ वर आल्या आहेत.
सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. ३,३१७ ते रु. ३,४७१). नंतर त्या घसरू लागल्या. या महिन्यात त्या (पेंडीच्या) वाढत्या निर्यातीच्या अपेक्षेने परत वाढू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने वाढून रु. ३,५०० पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,६३७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८, डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,४७२, रु. ३,५०१, रु. ३,५३० व रु. ३,५५९ आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे.
हळद
हळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ७,०९२ व रु. ७,५२८ दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्याने घसरून रु. ७,०५४ वर आल्या आहेत. स्पॉट (निजामाबाद) किमती रु. ७,३३० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,१००). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाऊस चांगला होत असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.
गहू
गव्हाच्या (ऑगस्ट २०१८) किमती १३ जूननंतर वाढत होत्या (रु. १,७९१ ते रु. १,८४८). या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी वाढून रु. १,८८७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,८६५ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९४३). पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.
गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,७३८ ते रु. ३,९९८). या महिन्यातसुद्धा तोच कल कायम आहे. गेल्या सप्ताहात त्या ६.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,०३५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,१४६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती २.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,०४७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२०५).
हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ३,३५३ रु. ३,६३५ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ६.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,८५९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,७९८ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ६.१ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ३,८५९). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे ही वाढ होत आहे.
कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती १२ जूननंतर घसरत आहेत (रु. २४,११० ते रु. २२,८००). गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. २२,६९० वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या ३.५ टक्क्यांनी वाढून रु. २३,४९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,०२१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती अनुक्रमे रु. २२,८९० व रु. २२,९०० आहेत. आंतरराष्ट्रीय किमती घसरत आहेत. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).
arun.cqr@gmail.com

0 comments:
Post a Comment