Friday, July 13, 2018

भुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतो

सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी काेसळतील. वातावरण सर्वसाधारणपणे ढगाळ राहील. सोमवार(ता. १६ )नंतर नाशिक, पुणे भागामध्ये पावसाचे चांगले वातावरण राहण्याची शक्यता आहे. जास्त पावसाची शक्यता आहे.  

सध्याच्या या वातावरणामध्ये भुरी व डाऊनी या दोन्ही रोगांचा धोका कमी-जास्त प्रमाणात राहू शकतो. ज्या ठिकाणी रिमझिम पाऊस बऱ्याच वेळा पडत असेल व नवीन फुटी वाढत असतील, अशा ठिकाणी बुरशीजन्य करपा वाढण्याची शक्यता आहे. अशा बागांमध्ये शक्य तेवढा खुडा करून वाढणाऱ्या फुटी कमी कराव्यात. जास्त काळ शेंडा वाढत राहिल्यास बुरशीजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये स्वतंत्रपणे किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.  
दोन्ही बुरशीनाशके मिसळून फवारल्याने बुरशीजन्य करपा रोगाबरोबर डाऊनी मिल्ड्यूचा धोकाही कमी होऊ शकेल.

शेंडा थांबलेल्या बागांमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशके वापरणे शक्य आहे. (उदा. कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर, किंवा कॉपर हायड्राॅक्साईड १.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा बोर्डो मिश्रण अर्धा टक्के). पाऊस अधूनमधून पडत असल्यास व पाने जास्त वेळ ओली राहत नसल्यास ढगाळ वातावरणामध्ये भुरीसुद्धा वेगाने वाढते. भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. सल्फर हे ताम्रयुक्त बुरशीनाशकांबरोबर मिसळून फवारणेही शक्य आहे.

रिमझिम पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळेस पानांमध्ये पोटॅशची कमतरता पाहावयास मिळेल. पोटॅशच्या कमतरतेमुळे पानांच्या वाट्या होतात. वाट्या झालेल्या बागेमध्ये भुरी वाढते. भुरी वाढू नये, यासाठी पोटॅशची कमतरता ठीक करणे आवश्यक आहे. यासाठी एसओपी (०-०-५०) २ ते ३ ग्रॅम किंवा मोनो पोटॅशिअम फॉस्फेट २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे. ही फवारणी सल्फरसोबतही देता येईल. या फवारणीमुळे झाडाची प्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे भुरीचे नियंत्रण चांगले मिळते.

ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस एक लिटर किंवा एक किलो प्रति एकर प्रमाणामध्ये ड्रिपमधून सोडावे. जमिनीमध्ये या जैविक नियंत्रणाच्या बुरशी चांगल्या प्रकारे वाढल्यास झाडामध्ये आंतरिक प्रतिकारशक्ती जास्त वाढते. परिणामी बागेतील रोगांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होते.

ज्या बागांमध्ये ट्रायअझोल गटातील बुरशीनाशके (उदा. मायक्लोब्युटॅनील, टेट्राकोनॅझोल, हेक्साकोनॅझोल इ.) किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशके वापरलेली नसतील, अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा ५ मि.लि. किंवा बॅसीलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणे शक्य आहे. बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे जैविक नियंत्रण घटक अपेक्षेप्रमाणे वाढणार नाहीत. बागेमध्ये बुरशीनाशके वापरली गेलेली असल्यास त्यावर कायटोसॅन (२ ते ३ मिली प्रति लिटर) फवारावे. त्यानंतर जैविक घटकांचा वापर केल्यास त्यांचा संपर्क बुरशीनाशकांबरोबर लगेच येणार नाही. त्यामुळे सध्याच्या जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणामध्ये जैविक नियंत्रण घटक कॅनोपीमध्ये चांगल्या रीतीने वाढू शकतील. याचबरोबर कायटोसॅनसुद्धा भुरीचे काही प्रमाणात नियंत्रण करू शकते.      
 
संपर्क : ०२०-२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

News Item ID: 
18-news_story-1531488166
Mobile Device Headline: 
भुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतो
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi,grapes , Agrowon, Maharashtra
Author Type: 
External Author
डॉ. एस. डी. सावंत
Search Functional Tags: 
द्राक्ष, विभाग, Sections, पुणे, ऊस, पाऊस

0 comments:

Post a Comment