Tuesday, July 10, 2018

फळबाग लागवडीची पूर्वतयारी...

फळबाग लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताची, खोली असणारी, मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असणारी जमीन निवडावी.

फळबाग लागवडीसाठी जमीन निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. योग्य जातींची निवड केल्याने अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते.  
जमिनीचा सामू ६.५  ते ८ दरम्यान असावा. जमिनीतील पाणीपातळी २ ते ३ मीटर खोल असावी.
जमिनीचा उतार २ ते ३ टक्यांपेक्षा जास्त नसावा.
जमिनीची क्षमता कमी असावी. सोडियमचे प्रमाण ३०० पीपीएमपेक्षा जास्त नसावे.
शेताच्या चोहोबाजूंनी पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदावेत.

जातींची निवड

  • भरपूर उत्पादन क्षमता असणाऱ्या जातीची निवड करावी.
  • आपल्या भागासाठी शिफारशीत  असावी.
  • कीड-रोगास प्रतिकारक्षम असावी.
  • निर्यातीस योग्य असावी.
  • आंबा : केसर, हापूस, रत्ना, तोतापुरी.
  • मोसंबी : न्यूसेलर, काटोल, गोल्ड, फुले मोसंबी
  • चिकू : कालीपत्ती, क्रिकेटबॉल
  • पेरू : सरदार (एल- ४९), ललित, अलाहाबाद सफेदा, श्‍वेता.
  • डाळिंब : भगवा, सुपर भगवा.
  • पपई : तैवान - ७८६
  • चिंच : नं. २६३, पीकेएम-१, प्रतिष्ठान.

सघन लागवड पद्धती

  • झाडांची छाटणी, विरळणी करणे सोपे जाते.
  • पारंपरिक लागवडीपेक्षा जादा उत्पादन.
  • झाडाचा आकार लहान असल्याने   कीड-रोग नियंत्रण, व्यवस्थापन,  फळांची काढणी सोपी व सहज शक्य होते.
  • कमी क्षेत्रातून जादा उत्पादन, फळांचा दर्जा, प्रत व गुणवत्ता, निर्यातक्षमता वढविता येते.
  • आंबा - ५ x ५ मी. (४०० झाडे/ हे.),२) पेरू ३ x १ मी. (२२२२ झाडे/ हे.),३) मोसंबी ५ x ५ मी. (४०० झाडे/ हेक्टर)

कलमे लावताना महत्त्वाचे

  • कलमे जमिनीत लावताना मुळांच्या क्षेत्रातील माती दाबावी.
  • लागवडीनंतर कलमांना ठिबकने पाणी द्यावे.
  • वाऱ्याचा वेग जास्त असल्यास काठीने कलमांना आधार द्यावा.
  • कलमे २ ते ३ दिवस शेतात सावलीत ठेवूनच लागवड करावी.
  • पिशवीतील मातीचा गोळा कलमे लावताना फुटणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • लागवड करताना कलमांचा जोड जमिनीत दाबला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

कलमांची निवड

  • सघन कलम एक वर्ष वयाचे असावे.
  • कलमांचा जोड एकसंध असावा.
  • जादा उंचीची कलमे लागवडीसाठी निवडू नयेत. कलमे कीड-रोगग्रस्त नसावीत.
  • कलमे जोमदार, टवटवीत व निरोगी असावीत.
  • शासकीय रोपवाटिका/ विद्यापीठ रोपवाटिका वा नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच कलमे खरेदी करावीत.
  • वाहतुकीदरम्यान कलमांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • कलमांच्या पिशवीत वापरलेले खत, माती मिश्रण सूत्रकृमी व इतर रोगांपासून मुक्त असावे.

खड्डा भरणे

  • जमिनीच्या पोताप्रमाणे योग्य अंतरावर खड्डे घ्यावेत.
  • खड्डे उन्हाळ्यात चांगले तापू द्यावेत.
  • खड्डा भरताना तळाशी २० ते २५ सें.मी. जाडीचा पालापाचोळा टाकावा, त्यामध्ये शिफारशीत कीटकनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने  भुकटी टाकावी.
  • दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत, १ किलो सुपर फॉस्फेट व पोयटा माती याच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा.

कलमे लावताना होणाऱ्या चुका

  • कलमाचा जोड मातीत दाबला जाणे.
  • योग्य जातीची कलमे खरेदी न करणे.
  • योग्य अंतरावर खड्डे घेतले जात नाहीत.
  • बहुतांश ठिकाणी खड्डे भरताना मातीचा वापर केला जातो.
  • वाहतुकीदरम्यान काळजी घेतली जात नाही.
  • मान्यताप्राप्त नसलेल्या लोकांकडून कलमे खरेदी करणे.

पारंपरिक लागवड व सघन लागवड

वैशिष्ठ्ये     पारंपारिक लागवड    सघन लागवड
फळधारणा   

पेरू - २ वर्षांनंतर

आंबा - ५ वर्षांनंतर  

१ वर्षानंतर

३ वर्षानंतर

उत्पादन/ हे.    पेरू १२-२०- टन
आंबा - ५-१० टन   
 ४०-६० टन
१५-२० टन
व्यवस्थापन    कठीण    सोपे
झाड संख्या/ हे.     पेरू २७७
आंबा १००  
२२२२
४००
काढणी   अवघड   सोपी
फळाची प्रत   कमी प्रतीची    उच्च प्रतीची
उत्पादन किंमत     जादा     कमी

संपर्क : डॉ. संजय पाटील, ९८९२०७१८५४
(केसर आंबा गुणवत्ता केंद्र,हिमायत बाग, औरंगाबाद)

News Item ID: 
18-news_story-1531206284
Mobile Device Headline: 
फळबाग लागवडीची पूर्वतयारी...
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi,preparation for fruit crop plantation, Agrowon, Maharashtra
Author Type: 
External Author
डॉ. संजय पाटील
Search Functional Tags: 
फळबाग, Horticulture, पाणी, Water, हापूस, टोल, पेरू, डाळ, डाळिंब, कीड-रोग नियंत्रण, Integrated Pest Management, IPM, खत, Fertiliser, खड्डे, कीटकनाशक

0 comments:

Post a Comment